Home ताज्या बातम्या BREAKING NEWS- सम्राट अशोकाला शोधणारा अशोक हरपला; डाॅ.अशोक शिलवंत यांचे निधन

BREAKING NEWS- सम्राट अशोकाला शोधणारा अशोक हरपला; डाॅ.अशोक शिलवंत यांचे निधन

0

पिंपरी,दि.09 आॅक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-सम्राट अशोकाला शोधणारा अशोक हरपला.सम्राट अशोकाचे पाईक,संत तुकाराम नगर येथील अशोक सहकारी बँकेचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ अशोक_शिलवंत यांचे वयाच्या 59 व्या वर्षी आज शुक्रवार दि.09 आॅक्टोबर 2020 रोजी हृदयविकराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.चळवळीचे कधी न भरुन निघणारे व्यक्तीमत्व काळाच्या पडद्या आड झाले.पिंपरी चिंचवड मनपा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या नगरसेविका मा. सुलक्षणा शिलवंत – धर यांचे वडील होते.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची कास धरून सम्राट अशोकाच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य त्यांनी केले आहे. एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जात होते.

बौध्द धम्माचा प्रचार व प्रसार जगभरात सम्राट अशोक यांनी केला. आज भारताबाहेर काही प्रमुख देशांमध्ये जो बौध्द धम्म आहे तो फक्त आणि फक्त सम्राट अशोकांमुळे आहे. बौध्द धम्म चिरकाल टिकवण्यासाठी त्यांनी गुहा, गुंफा, शिलालेख, लघुलेख,स्तंभ आदी खोदून-कोरून धम्माचा वारसा जपला व वाढविला. एक इतिहास घडला गेला, संस्कृतीच्या या चिरंतन स्मृती कायम राहिल्या गेल्या. परंतू सध्याच्या वर्तमान स्थितीत केवळ स्मृतींना उजाळा देण्याची औपचारिकता न ठेवता वेगळं काय करता येईल?यासाठी एक व्यक्ती विचार करू लागली आणि इतिहासाचं पान नव्याने लिहिण्याची चमकदार कामगिरी त्या व्यक्तीच्या हातून नकळत घडत गेली. एक अनोखे, अचंबित करणारे व विक्रम होईल असे काम अख्या जगात सध्या फक्त ती एकमेव व्यक्ती करत करत होती तिच नाव अशोक शिलवंत होत.


सम्राट अशोकाने १४ शिलालेख तयार केले होते. हाच धागा पकडून बौध्द धर्मियांच्या दृष्टीने महत्वाचे स्थान व इतिहास
असलेल्या जागेचे महत्व चिरकाल टिकावे म्हणून जगभरात १४ अशोक स्तंभ निर्माण करण्याचा संकल्प अशोक शिलवंत यांनी आखला . त्यापैकी लोणावळा (पुणे, महाराष्ट्र), रत्नागिरी
(महाराष्ट्र), येवला (नाशिक, महाराष्ट्र),आणि गया(उत्तरप्रदेश) कर्नाटक, स्तंभ काठमांडू (नेपाळ),
सातारा भिमाबाई स्मारक येथे,वा माणगांव येथे, वणंद-रमाबाईचे माहेर,कसबे तळवडे (उस्मानाबाट),वा.पानगाव (लातूर) असे १४ स्तंभ निर्माण करावयाचे आहेत.
अशोक शिलवंत हे सम्राट अशोकाच्या विचारधारेने झपाटून गेलले व्यक्तमत्व होते,१२ एप्रिल या सम्राट अशोक यांच्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्रातील तमाम ठिकाणी सम्राट अशोक जंयती साजरी करण्यास सुरवात केली बघता बघता संबध महाराष्र्टात नव्हे तर भारतात अशोक शिलवंत हे आंबेडकर चळवळीचे व्यक्ती मत्व परिचीत झाले.


समता निर्मितीसाठी सामाजिक चळवळी बरोबरच आर्थिक चळवळ ही तितकीच महत्वाची आहे आणि एकदा डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते “मला जर माझ्या समाजातील लोकांनी जर मला एक एक रुपया जरी दिला तर मी काहीतरी करून दाखवीन” ह्या वाक्याने प्रभावित होऊन अशोक नागरी सहकारी बँक मर्या, स्थापन केली. त्या माध्यमातून २००० लोकांना कर्ज देवून त्यांना स्वावलंबी बनण्यासाठी मदत केली. माझ्या सार्वजनिक जीवनातील व धम्मप्रेरीत पुढील आयुष्यात समाजासाठी जे काही करता येईल ते सर्व भव्य-दिव्य करण्याचा
संकल्प अशोक शिलवंत यांचा होता.त्यांना घडविणारे आई-वडील, मित्र मंडळी, सहकारी,आप्तेष्ट, हितचिंतक, नातेवाईक, माझी मुले, सूना, नातवंडे या सर्वांच्या
सहकार्याचा व प्रेमाचा ते सदैव ऋणी असत. उरवरीत स्तंभाचे काम त्यांची मुले व त्यांना मानणारे सर्व मिळुन पुर्ण करतील व अशोक शिलवंत यांचे स्वप्न पुर्ण करुन एक आदर्श जगा पुढे ठेवतील.भुमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असताना कामाचा सर्व व्याप संपवुन तितकाच वेळ धम्मकार्यात लावणारे अशोक शिलवंत आता आपल्यात राहिले नाही.हे आंबेडकर चळवळीतीला कधी ही न भरुन निघणारे व्यक्तीमत्व आता दिसणार नाही ही उनीव ही भरुन निघणार नाही त्यानी केलेल्या कार्याच्या माध्यमातुन ते सदैव आपल्यात राहतील. प्रजेचा विकास च्या माध्यमातुन मी संपादक विकास कडलक या उत्तुंग व्यक्तीमत्वाला श्रद्धांजली अर्पण करतो.

Previous articleकेंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाने देशभर लोकप्रिय दलित नेता हरपला – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
Next articleBreaking News – MPSC ची रविवारी होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five + seventeen =