Home ताज्या बातम्या BREAKING NEWS – रामविलास पासवान यांच निधन

BREAKING NEWS – रामविलास पासवान यांच निधन

66
0

नव्वी दिल्ली,दि.08 आॅक्टोबर 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांचं गुरुवारी 08 ऑक्टोबर 2020 रोजी संध्याकाळी निधन झालं आहे. त्यांचा मुलगा आणि लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. दिल्लीतल्या खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

बिहारमध्ये निवडणुका सुरू असतानाच पासवान यांचं निधन झालं आहे.आपल्या वडिलांसोबतचा एक जुना फोटो शेअर करताना चिराग यांनी लिहिलं, “पप्पा, तुम्ही आता या जगात नाही. पण मला माहीत आहे, तुम्ही नेहमी आमच्या सोबत असाल, MISS U PAPA.”

रामविलास पासवान केंद्र सरकारमध्ये ग्राहक संरक्षण मंत्री होते. गेले काही दिवस त्यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण आज काळाने घात केला असुन रामविलास पासवान काळाच्या पडध्या आड झाले.

Previous articleउदयनराजे नामोल्लेख टाळत “एक राजा बिनडोक आहे” अशी टिका प्रकाश आंबेडकरांनी केली;तर बंदला आणि मराठा आरक्षणाला पाठिंबा केला जाहिर
Next articleबलात्काराचे प्रकार रोखण्यासाठी नराधमांना फाशीची कठोर शिक्षा करा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 × three =