Home ताज्या बातम्या डाॅ.शीतल मच्छिंद्र रणधीर यांच्या संशोधनास अमेरिकेच्या प्रेसिडन्ट पुरस्काराने सन्मानित, संशोधनाची विश्व रेकॉर्ड...

डाॅ.शीतल मच्छिंद्र रणधीर यांच्या संशोधनास अमेरिकेच्या प्रेसिडन्ट पुरस्काराने सन्मानित, संशोधनाची विश्व रेकॉर्ड मध्ये नोंद

100
0

पुणे,दि.10आॅगस्ट 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-डॉ. शीतल मच्छिंद्र रणधीर यांच्या संशोधनाला अमेरिकेच्या प्रेसिडन्ट पुरस्काराने केले सन्मानित . या संशोधनाची विश्व रेकॉर्ड मध्ये नोंद झाली त्याब्बद्द्ल त्यांचे हार्दिक अभिनंदन.

प्रा. डॉ. शीतल मच्छिंद्र रणधीर या पुण्यातील टिकाराम जगन्नाथ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ( सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठ- महाराष्ट्रा पुणे) इथे सहयोगी प्राध्यापिका आहेत व त्या बी.बी.ए. विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांचे मुळगाव वरवंड –तालुका- दौंड- जिल्हा पुणे आहे. व पुण्यातील प्रायव्हेट रोड सिद्धार्थ नगर, ताडीवाला रोड इथे त्यांचे माहेर आहे. विकसनशील देशातील झोपडपट्ट्यांचा चिरंतन विकास या विषयावर त्यांनी संशोधन केले. यासाठी त्यांनी विविध मोडेल तयार केले. तसेच त्यांनी Global Women Empowerment & Sustainable Slum Development या विषयात संशोधन करून मोलाचे योगदान दिले आहे. यापैकी “ समाजाच्या सहभागातून चिरंतन विकास’ (Community Managed Sustainable Slum Development Scheme Model – CMSSDSM) हे मोडेल मांडणारी जगातील पहिली महिला जी स्वतः झोपडपट्टीवासीय आहे म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला व त्यांच्या संशोधनाची नोंद विश्व रेकॉर्ड मध्ये करण्यात आली आहे. त्यांचे हे संशोधन हे जगातील १०२ अब्ज झोपडपट्टीवासीयांच्या समस्यांवर सोपा उपाय आहे. शिवाय या झोपडपट्टीवासीयांना सेवा पुरवताना शासनावर येनारा आर्थिक तणाव व समस्यांवर CMSSDS मोडेल हा सोपा उपाय आहे. म्हणूनच यांच्या संशोधनाला अमेरिकेच्या प्रेसिडन्ट पुरस्काराने सन्मानित केले आहे. तसेच त्यांच्या या संशोधनामुळे त्यांना “ अंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला अवार्ड, अमेरिकेचा ग्लोबल अवार्ड, विद्या रत्न २०२० अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे.” त्यांच्या या कार्यामुळे एक शिक्षक म्हणून त्याना” आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट शिक्षिका” हा सन्मान गोल्ड मेडल सोबत मिळालेला आहे. त्यांच्या महावीद्यालयाने म्हणजे टिकाराम जगन्नाथ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स, पुणे महानगर पालिकेने व खडकी छावणी परिषदेने त्यांना “आदर्श शिक्षिका” म्हणून सन्मानित केले आहे. पुण्यातील विविध झोपडपट्टी मध्ये जाऊन त्यांनी “ १० वी १२ वी नंतर करियर कसे निवडावे” या विषया वरती मार्गदर्शन करताना त्यांनी समाजाच्या सहभागातून चिरंतन विकास’ (Community Managed Sustainable Slum Development Scheme Model – CMSSDSM) याचे सामाजिक भान निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच “एक स्वप्न झोपड पट्टीतून आणि अभ्यासासाठी विपश्चना ” या विषयावर प्रेरनादाई मार्गदर्शन त्यांनी झोपडपट्टीतील विद्यार्थ्यांना केले आणि विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत होणारा सकारात्मक बदल याचा अभ्यास केला. वयाच्या ३५ व्या वर्षी त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी. एच. डी. पदवी डॉ. मुकुंद तापकीर व प्रा. डॉ. रवींद्र बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदान झाली आहे. त्यांचे शालेय जीवन पुण्यातील साजनाबाई भंडारी विद्यालय ताडीवाला रोड इथे झाले असून, पदवी व पदव्युत्तर शिक्षण पुण्याचा नेस वाडिया महाविद्यालयात झाले. त्यांचे पी. एच. डी. चे शिक्षण पुण्यातील बृहन महारष्ट्रा कॉलेज मध्ये झाले. डॉ शीतल मच्छिंद्र रणधीर यांच्या संशोधनाला अमेरिकेच्या प्रेसिडन्ट पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल व या संशोधनाची विश्व रेकॉर्ड मध्ये नोंद झाली म्हणून त्यांचे हार्दिक अभिनंदन.

Previous articleकामगार कल्याण मंडळास अजमेरा येथील भूखंड देण्यास मंजूरी- डाॅ.भारती चव्हाण
Next articleदेहुरोड मध्ये रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या(आठवले)गटाच्या वतीने नांदेड माळेगाव यात्रा येथील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केल्या प्रकरणी निषेर्धात अंदोलन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eight − 5 =