Home ताज्या बातम्या कॅग कार्यालयाच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण

कॅग कार्यालयाच्या प्रांगणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते अनावरण

0

नवी दिल्ली,दि. 22 जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- भ्रष्टाचार हे देशाच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम करणारे सर्वात मोठे संकट असल्याचे मत उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. अशा भ्रष्टाचाराला देशातून हद्दपार करण्याठी सरकार, समाज आणि नागरिकांनी एकत्रित  प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. नवी दिल्ली येथील नियंत्रक आणि महालेखा परीक्षक (कॅग) कार्यालयाच्या प्रांगणातउभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण आज उपराष्ट्रपतींच्या हस्ते झाले, त्यानंतर ते बोलत होते.

माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या वचनांचे स्मरण करतउपराष्ट्रपती म्हणाले की पालकांबरोबरच शिक्षकही विद्यार्थ्यांचे चारित्र्यघडविण्यात आणि मूल्याधारित समाजाची निर्मिती करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

डॉ. आंबेडकर यांना मन:पूर्वक आदरांजली अर्पण करत उपराष्ट्रपती म्हणाले की त्यांचे व्यक्तीमत्व बहुआयामी होते. ते प्रतिभावंत – दूरदर्शी राजकारणी, तत्वज्ञ, बुद्धीवंत, प्रख्यात न्यायविद्, अर्थशास्त्रज्ञ, लेखक आणि समाजसुधारक होते त्याचबरोबर सहृदय मानवतावादी होते.

भारताचे संविधान हे जगातील सर्वात सक्षम संविधानांपैकी एक असल्याचे सांगत उपराष्ट्रपतींनी डॉ. आंबेडकर यांनी राज्यघटनेचा मसुदा तयार करतानादिलेल्या मोलाच्या योगदानाचे आणि निर्णायक परिस्थितीत देशालामार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले.

उपराष्ट्रपती म्हणाले की आपली राज्यघटना हा एक पवित्र ग्रंथ असून त्याने आतापर्यंत सर्वच बाबींवर मार्गदर्शन केले आहे. देशातील प्रत्येक नागरिकाने आपल्या राज्यघटनेचे पावित्र्य कायम राखले पाहिजे आणि त्या पावित्र्याचा कधीही भंग होऊ नये, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन उपराष्ट्रपतींनी केले.

डॉ. आंबेडकर हे दुर्बलांचे तारणहार असल्याचे सांगत उपराष्ट्रपती म्हणाले की डॉ. आंबेडकर यांनी आयुष्यभर लैंगिक समानतेवर तसेच शिक्षणाच्या माध्यमातून स्त्रियांना मुक्ती मिळेल, यावर दृढ विश्वास ठेवला. त्यांनी जातीय अडथळे दूर करण्याचा आणि सर्व लोकांसाठी समानतेची वागणूक सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला.

“या महान माणसाच्या आदर्शांची आठवण करून देण्यासाठी तसेच आजच्याआणि भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरणारी त्यांची शिकवण दीर्घकाळ स्मरणात राहावी, या उद्देशाने डॉ. आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे,” असे उपराष्ट्रपती म्हणाले.

कॅग ही एक मजबूत आणि विश्वासार्ह संस्था असल्याचे गौरवोद्गार उपराष्ट्रपतींनी काढले. या संस्थेला असणारी स्वायत्तता आणि व्यापक अधिकार यांचे श्रेय आपल्या राज्यघटनेला, खासकरुन डॉ. आंबेडकर यांना असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. स्वातंत्र्य, वस्तुनिष्ठता, प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, व्यावसायिक उत्कृष्टता, पारदर्शकता आणि सकारात्मक दृष्टीकोन ही कॅगची मूलभूत मूल्ये असून डॉ. आंबेडकरांचे जीवन आणि त्यांच्या कार्यापासून ती प्रेरित असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. लोकशाहीसाठी विश्वासार्हता, पारदर्शकता आणि सुप्रशासन अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

नियामक चौकट, शासन व्यवस्था आणि सरकारच्या वितरण व्यवस्थेतीलबदल, तसेच अर्थव्यवस्था, कार्यक्षमता आणि सरकारी कामकाजातील परीणामकारकता सुनिश्चित करण्याचे श्रेय, कॅगचे अहवाल आणि विधीमंडळ समित्यांच्या चर्चांना असल्याचेही उपराष्ट्रपतींनी सांगितले.

सुप्रीम ऑडिट इन्स्टीट्यूशन (एसएआय) च्या आंतरराष्ट्रीय समुदायामध्ये उत्कृष्ट प्रतिष्ठा प्राप्त केल्याबद्दल तसेच 2020 वर्षापर्यंत पूर्णपणे कागदविरहित कार्यालय होण्याच्या प्रयत्नांबद्दल त्यांनी कॅगची प्रशंसा केली.

तत्पूर्वी नियंत्रक आणि महालेखा परीक्षक राजीव मेहर्षी यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले तर उप नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अनिता पट्टनायक यांनी सरतेशेवटी आभार व्यक्त केले.

Previous articleबौद्धिक संपत्तीविषयी जनजागृती होण्याची गरज आहे- चेतन गुंदेचा.
Next articleउपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी काहीही चुकीचं केलेलं नाही;गप्प बसणारा मी नाही, तिथल्या तिथे राजीनामा दिला असता-उदयनराजे भोसले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two + 2 =