मुंबई,दि.8 जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांने -मिथिल उमरकर याने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता अरविंद बनसोड याची ,त्याने मिथिल उमरकर याच्या गैस एजंसी बद्दल माहिती घेतली म्हणून, भरचौकात हत्या केली.या घटनेला एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे मात्र अद्यापही आरोपी मिथिल उमरकर ह्याला अटक करण्यात आली नाही. ह्या गंभीर प़्रकरणात आरोपी मिथिल उमरकर ह्याला पाठिशी घालण्यात येत आहे,
त्याचप्रमाणे राजगृह हे आंबेडकरी अनुयायांसाठी महत्वाचे ठिकाण आहे.काल संध्याकाळी दोन अज्ञात माथेफिरूंनी बाबासाहेबांचे निवासस्थान म्हणून ओळख असणाऱ्या राजगृहावर हल्ला केला असून घराबाहेरील कुंड्या, खिडकीच्या काचा तसेच CCTV कॅमेरांचे देखील नुकसान केले आहे.
या हल्ल्यामुळे आंबेडकरी जनतेत अत्यंत संताप उसळला असून या घटनेची सखोल चौकशी करुन आरोपींना त्वरित अटक करण्यात यावी अमागणीथ रिपब्लिकन पक्ष मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केला आहे.आरोपीला त्वरित अटक करा,हे सरकार दलित विरोधी असून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्या आदि मागण्यांसाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले मार्गदर्शनाखाली येत्या 11 जुलै रोजी मुंबईत ठिकठिकाणी निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी दिली आहे.
11 जुलै 1997 रोजी घाटकोपर पूर्व माता रमाबाई आंबेडकर नगर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर त्याच्या निषेधार्थ रस्त्यावर उतरलेल्या निरपराध आंबेडकरी अनुयायांवर बेछूट गोळीबार करण्यात आला. त्यात 11 जण शहीद झाले होते,त्या शहिदांना अभिवादन करून त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त येत्या 11 जुलै रोजी महाराष्ट्रात वाढत असलेल्या दलित अत्याचारांच्या निषेधार्थ रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते मुंबईत ठिकठिकाणी निदर्शने करून,जिल्हाधिकारी,तहसिलदार ,पोलिसांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार असल्याचे गौतम सोनवणे यांनी सांगितले.
गौतम सोनवणे म्हणाले कि गेल्या काही दिवसांपासून विविध जिल्हात बौध्दांवरील हल्ले वाढत आहे.पिंपरी-चिंचवड येथील पिंपळे सौदागर येथील विराज जगताप ह्या तरुणाने उच्च जातीच्या मुलीवर प्रेम केले म्हणून त्याची हत्या करण्यात आली, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील देहेड गावात बौद्धांवर सुरू असलेला अत्याचार , जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील महिंदळ गावात बौद्धांवर झालेल्या हल्ल्याच्या वेळी महिलांचे कपडे फाडण्यापर्यंत गेलेली गावगुंडांची मजल , परभणी जिल्ह्यातील पुर्णा तालुक्यातील साळापुरी गावात बौद्ध तरुणांना रक्तबंबाळ होईपर्यंत केलेली मारहाण ह्या घटना राज्यात कायदा-सुव्यवस्था शिल्लक आहे का? असा सवाल गौतम सोनवणे यांनी केला आहे. राज्यात दलित,बौद्धावर तसेच महिलांवर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाली आहे. तसेच गृहमंत्र्यांना दलितांवरील वाढत्या अन्याय अत्याचार जाब विचारणा-या सोलापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यां बाबतीतील गंभीर गुन्हे त्वरित मागे घ्यावे,पोलिस अधिका-यांवर नियंत्रण नसणा-या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे यांनी केली आहे.
Home ताज्या बातम्या बौध्दांवरील वाढते हल्ले तसेच राजगृहावर भ्याड हल्ल्याचा निषेधार्थ 11 जुलै रोजी मुंबईत...