Home ताज्या बातम्या ‘GST’ चा आज तिसरा वाढदिवस; आजच्या दिवशी देशाला मिळाली नवी कर प्रणाली

‘GST’ चा आज तिसरा वाढदिवस; आजच्या दिवशी देशाला मिळाली नवी कर प्रणाली

94
0

नवी दिल्ली,दि. 1 जुलै 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- संपूर्ण जगात आणि देशात १ जुलै या दिवशी अनेक ऐतिहासिक घटनांची नोंद आहे. भारतासाठी देखील १ जुलै हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. याच दिवशी भारताला नवी कर प्रणाली मिळाली होती. ३० जून २०१७ च्या मध्यरात्री संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये देशातील वस्तू व सेवा कर (Goods and Services Tax) म्हणजेच GST या नव्या कर प्रणालीची तत्कालीन राष्ट्रपति प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते लागू करण्यात आली होती.

‘वन नेशन वन टॅक्स ‘ अशी घोषणा करत केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नैतृत्वातील सरकारने देशात नवी कर प्रणाली लागू केली होती. ३० जूनच्या मध्यरात्री घोषणा करण्यात आलेली नवी कर प्रणाली देशात १ जुलैपासून लागू करण्यात आली. नोटाबंदीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने घेतलेला हा सर्वात मोठा निर्णय मानला जातो. तत्कालीन देशाचे अर्थमंत्री दिवंगत अरुण जेटली यांचं GST कर प्रणाली भारतात लागू करण्यामध्ये मोठं योगदान होतं. दरम्यान, १ जून रोजी अशा अनेक घटना फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात घडल्या, ज्या आज इतिहासात नमूद आहेत.

१ जुलैच्या इतिहासात नोंदवलेल्या इतर घटना खालीलप्रमाणे-

१७८१ : हैदर अली आणि ब्रिटीश सैन्य यांच्यात युद्ध झाले.

१८५२ : ‘सिंध डाक’ नावाचे तिकिट सिंधचे मुख्य आयुक्त सर बर्टलफ्रूर यांनी फक्त सिंध राज्य आणि मुंबई कराची मार्गावर वापरण्यासाठी दिले होते.

नैसर्गिक वायू, हवाई इंधन ‘जीएसटी’च्या कक्षेत?

१८६२ : कलकत्ता उच्च न्यायालयाचे उद्घाटन झाले.

१८७९ : भारतात पॉडकास्टची सुरूवात झाली.

१९५५ : इम्पीरियल बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण झाले आणि त्याला भारतीय स्टेट बँक असे नाव देण्यात आले.

१९६० : आफ्रिकेचा घाना प्रजासत्ताक म्हणून घोषित करण्यात आला.

Previous articleमुख्यमंत्र्यांकडून सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची महापूजा, बडे दाम्पत्याला महापूजेचा मान
Next articleकोणत्या निकषावर तुम्ही पत्रकारांना नोकरीवरून काढले? उच्च न्यायालयाचा वृत्तपत्र मालकांना सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

11 + fifteen =