देहुरोड-विकासनगर,दि 30 जुन 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- सतत वादाच्या चर्चेत आसणार्या किवळे येथील विब्स इंग्लिश मिडियम शाळेत शासनाने वह्या पुस्तकांची शाळेत विक्री करण्यास मनाई असताना सुद्धा बेकायदेशीरपणे शाळेत विक्री केली जाते यामुळे बेकायदेशीर विक्री तात्काळ बंद करून पालकांकडून होणारी लूट थांबवली असुन मीना कॉलनी येथे दि.25 जुन ला महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी तसेच माजी नगरसेवक मनोज खानोलकर व नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाही करण्यात आली.किवळे येथील विद्या भुवन (विन्स) इंग्रजी माध्यमिक शाळेत अयोग्य पद्धतीने वह्या,पुस्तके विक्रीसाठी ठेवल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शिक्षण मंडळाने गुरुवारी (दि.25) शाळेच्या चार वर्ग खोल्यांना सील केल्या आहेत.विकासनगर येथे विन्स इंग्रजी माध्यमिक शाळेमध्ये वह्या पुस्तकांची विक्री होत असल्याची तसेच त्यासंदर्भातील ऑडिओ क्लिप पाठविल्याची तक्रार पालकांनीर आर टीआय कार्यकर्ते श्रीजित रमेशन आणि
नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार नगरसेविका खानोलकर यांनी
शिक्षण मंडळाकडे दोन दिवसांपूर्वी तक्रारही दाखल केली होती.तर दि.२६जुन रोजी रमेशन यांनी आयुक्त हार्डीकर व शिक्षण विभागात तसेच देहुरोड पोलिस स्टेशन येथे शाळेवर फौजदारी दाखल करण्यात यावी तसेच शाळेचा मुजोर कारभार थांबवावे या मागणीचे अर्ज दाखल केले आहेत, शिक्षण अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांच्या मार्गदर्शनात शिक्षण मंडळाचे तक्रार निवारण अधिकारी तथा पर्यवेक्षक विलास पाटील आणि रवींद्र शिंदे यांनी गुरुवारी
शाळेची पाहणी केली. मुख्याध्यापिका शालु डे,नगरसेविका खानोलकर,मा.नगरसेवक मनोज खानोलकर, तुकाराम भोंडवे, आरटी आय कार्यकर्ते रमेशन, दोन पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीत वह्या-पुस्तक ठेवलेले चार वर्ग खोल्यांना सील करण्यात आले.
लखो रूपयाचे वहया पुस्तके व ईतर साहित्य असलेल्या 4 खोल्या महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सील केल्या आहेत,तर पालकांन मध्ये हा चर्चेचा विषय ठरला आसुन प्रशासन शाळेवर काय कारवाही करेल या कडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.
श्रीजीत रमेशन, आरटीआय कार्यकर्ते
“कोरोना संकटात नागरिक हैराण झाले
असताना शाळेकडून फी आकारणी
करणे तसेच बेकायदेशीररित्या शाळेच्या नावाच्या बॅग, वह्या- पुस्तकांची विक्रीहे गैर आहे. याबाबतची तक्रार पालकांनी
केली होती.शाळा बेकायदेशीर कामाच्या बाबतीत चर्चेत असुन वारंवार तक्रारी शाळे बाबत येत आहेत,खोल्या सिल करुन काही दिवस उलटुन गेले आहेत अजुन फौजदारी दाखल झाली नाही,व ठोस कारवाही झाली नाही, मी शिक्षण विभाग पालिका आयुक्त व शैक्षणीक व इतर ठिकाणी पञव्यवहार करुन कारवाही करावी अशी पञा द्वारे मागणी केली आहे,अशा शाळेला जो कोणी नगरसेवक व नेता कार्यकर्ता मदत करत असेल अश्रय देत असेल तर त्यावर पण कारवाही करु,कोणाची तक्रार असल्यास माझ्याशी संपर्क साधु शकता.
एस.डे., मुख्याध्यापिका
शाळेतील विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी
वह्या, पुस्तके उपलब्ध व्हावी, त्यासाठी विक्रेत्याने शाळेच्या प्रिमायसेसमध्ये स्टॉल लावले आहेत.
विलास पाटील, तक्रार निवारण अधिकारी तथा पर्यवेक्षक
शाळेच्या प्रिमायसेसमध्ये वह्या,पुस्तकांची विक्री करणे गैर आहे. चार वर्गखोल्या सीलही करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी तपास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.