पुनावळे,दि.१८ मे २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-लाकडी दांडक्याने डोक्यात मारहाण करून कुख्यात गुंड महाकालीचा भाऊ मनोज उर्फ डिंगऱ्या ढकोलिया याचा खून करण्यात आला. ही घटना रविवारी(दि .१७ ) रात्री पुनावळे येथील लंडन ब्रिजच्या खाली घडली .मनोज उर्फ डिंगऱ्या फुलचंद दकोलिया (वय ३५ , रा.रमाबाई नगर , रावेत , पुणे ) असे खून झालेल्या गुंडाचे नाव आहे . याप्रकरणी आदम उर्फ गोट्या महमद खान ( वय ३२ वर्षे रा . स्मशान भूमीजवळ , पूनावळे ) या संशयिताला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने ताब्यात घेतले आहे . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , डिंगऱ्या आणि आदम हे दारू पिण्यासाठी पुनावळे येथील लंडन ब्रिजखाली बसले होते . दारू पित असताना त्यांच्यात भांडण झाले .यावेळी आदम याने लाकडी दांडक्याने डिंगऱ्याला डोक्यात मारहाण केली . त्यानंतर आदम घटनास्थळावरून पळून गेला . याबाबतची माहिती मिळताच वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी डिंगऱ्याला त्वरित रुग्णालयात दाखल केले . मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले . कुख्यात गुंड महाकालीचा एन्काऊंटर झाल्यानंतर काही दिवस त्याचा भाऊ डिंगऱ्याने गँग चालविण्याचा प्रयत्न केला . मात्र त्यात त्याला यश मिळाले नाही . डिंगऱ्यावर नऊ गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असून त्याला तडीपार करण्यात आले होते . मात्र तडीपारीच्या आदेशाचा भंग करून तो पिंपरी चिंचवड शहरात आला होता .