किवळे,दि.१७ मे २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-विकास नगर किवळे भागातील मुकाई चौक रस्त्यालगत मुकाई मंदिराजवळील निळकंठ फर्निचर या दुकानाला दुपारी ३.००वा अचानकपणे भीषण आग लागली, आग लागल्याचे पाहून स्थानीक युवानेते सुमित तरस यांनी त्वरित फायर ब्रिगेड ला भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला तत्काळ फायर ब्रिगेडच्या गाड्या त्यांच्या टीम सहित घटनास्थळी दाखल झाल्या व दुकानाला लागलेली आग,तब्बल एक तास आग विजवण्यास लागले,आग विजवल्यानंतर संपुर्ण परिस्थिती आटोक्यात आली मात्र फर्निचरचे संपूर्ण दुकान जळून खाक झाले,दुकानाचे संंपुर्ण नुकसान झाले असुन, निळकंठ फर्निचर दुकाना शेजारील कोणत्याही दुकानाला ह्या आगीमुळे इजा झाली नाही व आगीचा फटका आजूबाजूच्या दुकानांना बसला नाही. स्थानीक नागरीकांच्या खबरदारी मुळे कुठलेही नुकसान झाले नाही या आगीमध्येही कोणतीही जीवितहानी झाली नाही,आग विझवत असताना हा संपूर्ण थरारक प्रकार तब्बल दीड तास चालला होता, घटनास्थळी फायर ब्रिगेडचे जवान अशोक कदम,टिम प्रमुख शांताराम काटे अरविंद गुळी,चंद्र शेखर घुले,प्रतिक कांबळे अशोक इंगवले,शहाजी कोकणर,विशाल बानेकर,जमकर ,विष्णू चव्हाण,भाउसाहेब दराडे,श्रीकांत वैरागर,वाटकरे ट्रेनिंग सब आॅफीसर जवान,इतर अग्नीशामक कर्मचारी यांनी हि आग विझवली,तर घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक अशोक कोकाटे,पोलिस उपनिरीक्षक योगेश रामेकर,पो.काॅ.निलेश जाधव, पो काॅ.चापळे,तसेच निलेश तरस,कैलास म्हसुडगे,दत्ता तरस,राजु तरस आदी.स्थानीक नागरीक उपस्थित होते.
निळकंठ फर्निचर या दुकानाचे मालक नागराज जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार या दुकानात फ्रिज वॉशिंग मशीन एसी टीव्ही एलसीडी एलईडी त्याचप्रमाणे सर्व प्रकारच्या महागड्या वस्तू होत्या,माञ आगीत त्या सर्व खाक झाल्यात ३०ते ३५ लाख रुपयाचे अर्थिक नुकसान झाले आहे,कोरोना प्रादुर्भावा मुळे ते गावाकडे अडकले असुन दुकानाला लागलेली आगीची माहीती स्थानीक नागरीकांनी जाधव याना फोन द्वारे दिली.जाधव हे सैन्य दलातुन रिटार झाले होते,त्यांनी संपुर्ण रिटारमनचा पैसा जो आहे तो ह्या दुकानात लावला होता,आता अर्थिक कणा माञ त्यांचा घडलेल्या प्रकारामुळे मोडला आहे.