Home ताज्या बातम्या देव हा आता मंदिरात नाही तर……..-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

देव हा आता मंदिरात नाही तर……..-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

58
0

मंबई,दि.26 एप्रिल 2020(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):-महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सर्वांशी संवाद साधला. लॉकडाऊनच्या काळात सहकार्याबद्दल सर्वधर्मियांनांचे आभार मानले. आपले सण आपापल्या घरात राहूनच साजरे करा. आता रमजानचा महिना आहे. घरात राहूनच नमाज पडा अशी विनंती मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांनी केली . मुस्लिम बांधवांना आवाहन केलं . सण बाजूला ठेवून देशाला प्राधान्य दिलं जातंय हेच समाधानकारक आहे.देव हा आता मंदिरात नाही तर माणसा माणसात व त्यांच्या संयमात आहे. अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेले पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी आणि यामध्ये काम करणाऱ्या सर्व लोकांमध्ये देव आहे. सर्व कोरोना योद्धांचा आदर करा. ते खूप तणावाखाली काम करत आहेत.तसेच कोरोनामुळे २ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. शहीद पोलिसांना मुख्यमंत्र्यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली. तसेच रूग्णसंख्येचा गुणाकार आपण रोखला आहे. कोरोनाचं हे संकट कुणालाच अपेक्षित नव्हतं.

नितीन गडकरींचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मनापासून आभार मानले आहेत. राजकारण बाजूला ठेवून आपण सगळे लोकं एकत्र आलोत. राजकारण टाळण्याचा सल्ला नितीन गडकरींना दिला आहे. अजूनही काही जण राजकारण करत आहेत. पण ठिक आहे त्यांना राजकारण करू द्या. ३ तारखेनंतर मुभा देण्याचा विचार केला जाणार आहे. मात्र जिल्ह्यांच्या सीमा उघडल्या जाणार नाही. जिल्ह्यात काही उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र गर्दी टाळा. सोशल डिस्टिन्शिंगचे नियम पाळावेच लागणार आहेत.

तसेच नागरिकांना आवाहन केलंय की, कोणताही त्रास जाणवला तर फिवर क्लिनिकमध्ये जा. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच स्वतःची काळजी घ्या. घरात व्यायाम करण्याचा सल्ला दिला आहे. सरकारतर्फे ३ फिवर क्लिनिक तयार करण्यात आले आहेत.

छोटी मोठी क्लिनिक, हॉस्पिटल सुरू करा. आपण रूग्णसंख्येचा गुणाकार रोखला आहे. मुंबईत वर्दळ वाढवून आपल्याला चालणार नाही.

१०८९७२ चाचण्या राज्यात करण्यात आल्या आहेत. तसेच ७६२८ पॉझिटिव्ह रूग्ण असून ३२३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. १,०१,१६२ नागरिकांच्या टेस्ट या निगेटिव्ह आल्या आहेत. तरीही ही लढाई आपण लढतोय.
हिंदुस्तान कोरोनाचं हे संकट औषध बाजारात येण्या अगोदरच जिंकेल. हे युद्ध आपण आत्मविश्वासाच्या जोरावर जिंकणार आहोत. आपला विश्वास आणि आपला आशिर्वाद हेच आमचं बळ आहे.

देव आता मंदीरात नाही,तर .. काय म्हटले मुख्यमंञी उद्धव ठाकरे पहा व्हिडीओ

Previous article(मन की बात)’भारतात कुठेही लापरवाही होऊ नये याची काळजी घ्या.-पंतप्रधान नरेंद्र मोदी
Next articleपिंपरी चिंचवड शहरातील १६ ठिकाणांच्या परिसरात कंटेनमेंट झोन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

3 × 2 =