Home ताज्या बातम्या रावण टोळीतील कुख्यात गुंड सोन्या जाधव याचा खुन! आरोपींना देहुरोड पोलीस स्टेशनच्या...

रावण टोळीतील कुख्यात गुंड सोन्या जाधव याचा खुन! आरोपींना देहुरोड पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने दोन तासांत केल गजाआड

75
0

आकुर्डी,दि.१७ मार्च २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):– पिंपरी चिंचवड शहरातील आकुर्डी परिसरात रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधवच्या भावाचा खून झाला ही घटना मंगळवारी (दि .१७ ) दुपारी घडली .अविनाश उर्फ सोन्या राजेंद्र जाधव ( २५ ,रा .रावेत ) खून झालेल्या व्यक्तीचे नाव असुन .निगडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकुर्डी येथील पोस्ट ऑफिस समोर एक गॅरेज आहे . या ठिकाणी सोन्या हा मित्रांसोबत दारु पित बसला होता . दारू पिताना त्यांच्यामध्ये भांडण झाले . यावेळी चिडलेल्या त्याच्या मित्रांनी गॅरेज मधील साहित्याने सोन्याच्या डोक्यात वार करत रक्तबंबाळ झालेल्या सोन्याला तिथच सोडून पसार झाले . निगडी पोलिसांना माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले . सोन्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले . सोन्यावर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत . सोन्या हा रावण टोळीचा प्रमुख अनिकेत जाधव याचा भाऊ होता . निगडी पोलिसांनी संशयित ताब्यात घेत चौकशी सुरु केली.बातमी कळताच रावण टोळीतील कुख्यात गुंड सोन्या जाधव याचा खुन करणाऱ्या आरोपींना देहुरोड पोलीस स्टेशनच्य् तपास पथकाने ०२ तासांत केले जेरबंद,
तपास पथकाचे सपोनि श्री. पी.जी. गज्जेवार तसेच पोलीस उपनिरीक्षक जगताप, पो.हवा.११९ शिंदे, पो.ना. ६४६ प्रितम वाघ, पो.ना. ७९४ पवार, पो.शि. २५०५ शेजाळ, पो.शि. १७३२ गेंगजे असे पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना दुपारी ०४ च्या सुमारास निगडी पोलीसठाणे हद्दीमध्ये रावण टोळीतील कुख्यात गुंड सोन्या जाधव याचा कोणीतरी अज्ञात इसमांनी खुन केल्याबाबत माहिती मिळाली. बातमीच्या अनुशंगाने पेट्रोलिंग करीत असताना पो.ना.प्रितम वाघ यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, निगडी येथे सोन्या जाधव याचा खुन करणारे संशयित आरोपी किवळे येथे लपुन बसले आहेत. वाघ यांनी बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो. यांना कळविली असता वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिष कल्याणकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार स.पो.नि. श्री गज्जेवार व तपास पथकातील कर्मचारी स्टाफसह किवळे येथे सिम्बोसिस कॉलेजच्या पाठीमागील बाजुस असलेल्या वडाच्या झाडाजवळ गेले तर तेथे पाच ही जण संशयितरित्या बसलेल्या स्थितीत आढळले त्यांना पोलीसांनी ताब्यात घेवुन त्यांच्याकडे चौकशी केली . त्यांनी निगडी येथे सोन्या जाधवचा खुन केला असल्याबाबत सांगितले.त्यांची नावे अशिष विशाल जगताप, (वय २३ वर्ष रा. पंचशिल हौसिंग सोसायटी सेक्टर नं. २७ निगडी प्राधिकरण पुणे.),प्रसाद अशोक आल्हाट (वय २५ वर्षे रा.पंचशिल होसिंग सोसायटी सेक्टर नं.२७ निगडी प्राधिकरण पणे),विकास गोरख तांदळे (वय २१ वर्षे रा. पंचशिल होसिंग सोसायटी सेक्टर नं. २७ निगडी प्राधिकरण पुणे), सागर रमेश धनवटे (वय १८ वर्षे रा. प्राधिकरण पोस्ट ऑफिस, संभाजी चौक निगडी प्राधिकरण पुणे), विधिसंघर्षग्रस्त बालक नामे – प्रबुध्द दिनेश घोडके (वय १७ वर्षे रा. पंचशिल हौसिंग सोसायटी सेक्टर नं.२७ निगडी प्राधिकरण पुणे) आहेत सदर आरोपींना पुढिल तपासकामी निगडी पोलीस ठाणे यांच्य् ताब्यात देण्यात आले.सदरची कामगीरी मा. पोलीस आयुक्त सो श्री. संदिप बिष्णोई, मा. अप्पर पोलीस आयुक्त सो श्री रामनाथ पोकळे, मा. पोलीस उप-आयुक्त सो परि.०२ श्री विनायक ढाकणे, मा. सहा.पोलीस आयुक्त सो श्री. संजय नाईक-पाटील देहुरोड विभाग, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सो श्री मनिष कल्याणकर, यांच्या मार्गदर्शनाखाली देहुरोड पोलीस स्टेशन तपास पथकाचे ,सपोनि. श्रीप्रसाद गज्जेवार, पोलीस उप-निरीक्षक अशोक जगताप, पो.हवा. शिंदे पो.ना. प्रितम वाघ, पोना प्रशांत पवार, पोशि सचिन शेजाळ, पोशि विजय गेंगजे, यांनी केली आहे.

Previous articleCorono-शासकीय कार्यालये, सार्वजनिक वाहतूक बंद राहणार नाहीत
Next articleपिंपरी मनपातील एनयूएचएम कर्मचा-यांना पुर्वलक्षी प्रभावाने किमान वेतन मिळणार – केशव घोळवे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

17 − 1 =