Home ताज्या बातम्या छञपती शिवाजी महाराजाची फेसबुक वरील अवमान प्रकरणी पेनुर कडकडीत बंद

छञपती शिवाजी महाराजाची फेसबुक वरील अवमान प्रकरणी पेनुर कडकडीत बंद

57
0

लोहा,दि.४मार्च२०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-गोविंद पवार):-लोहा तालुक्यातील पेनुर ( मोठे ) येथे छञपती शिवाजी महाराज यांचा अवमान प्रकरणी कडकडीत बंद पाळण्यात आला आहे.पेनुर येथील चंद्रकांत एडके या युवकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून छञपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमान कारक भाष्य केले . या सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेल्या अवमानक कृत्याचा निषेध करत पेनुर येथील शिवप्रेमींनी सोनखेडचे पोलिस निरीक्षक सुधाकर आडे सर यांना निवेदन दिले व छञपती शिवाजी महाराज यांच्या अवमान करणाऱ्या युवकाला तात्काळ अटक करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे .या प्रकरणाचे पडसाद लोहा शहरात उमटले असुन लोहा येथील शिवप्रेमींनी ज्या युवकाने छञपती शिवाजी महाराज यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून अवमान केला त्या युवकाच्या विरोधात निवेदन देऊन तात्काळ अटक करावी अशी मागणी केली.
पेनुर येथील प्रकरणात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सोनखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुधाकर आडे साहेब व त्यांच्या सहकाऱ्यांनी पेनुर येथील चंद्रकांत एडके यांना ताब्यात घेऊन गावातील सर्व समाज बांधवांना शांततेचे आवाहन केले आहे.
आज दुपारी 2 वाजता लोहा शहरात छञपती शिवाजी महाराज चौकात सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील चव्हाण हे छञपती शिवाजी महाराज यांचा सोशल मीडियाच्या माध्यमातून जो अवमान झालेला आहे त्या युवकाला कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी सत्याग्रहास बसत आहेत. एवढेच नव्हे तर आज पण त्या युवकाला कठोर कारवाई व्हावी यासाठी पेनुर येथील शिवप्रेमींनी आज पेनुर बंदाचे आव्हान केले व पेनुर कडकडीत बंद केले आहे.

Previous articleसुमित ग्रुपकडून ई-वाहनांची बाजारपेठ उपलब्ध वाहन विक्रीवर प्रोत्साहनपर देणार ५०००/-रु भत्ता
Next articleभारत अजूनही अर्थ क्षेत्रात विकसनशीलच-..डॉ. उमराणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × 4 =