Home ताज्या बातम्या हळदीयुक्त दुधाचे हे फायदे जाणुन घ्या. आश्चर्यचकित व्हाल

हळदीयुक्त दुधाचे हे फायदे जाणुन घ्या. आश्चर्यचकित व्हाल

0

देहुरोड,दि12 फेब्रुवारी 2020(प्रजेचा विकास प्रतिनीधी):-कोणत्याही आजारावर हळद हा रामबाण उपाय समजला जातो. दुधातून कॅल्शिअम भरपूर मिळते. हळदी ही एंटीबायोटिक म्हणून ओळखली जाते. त्यामुळे हळद टाकून दूध प्यायल्याने त्याचे अनेक दुहेरी होतात. असेच हळदीयुक्त दुधाचे १० फायदे आहेत. जे तुम्हाला रोजच्या वापरासाठी १० हळदीयुक्त दुधाचे फायदे आहेत.

१. जखम : जर तुम्हाला एखाद्या कारणामुळे जखम झाली तर त्याठिकाणी हळद हे अँटीबॅक्टेरिअल म्हणून काम करतं. हळद बॅकटेरिया मारण्यासाठी मदत करतं.
२. शारिरीक दुखणं : शरीराचा कोणताही भाग जर दुखत असेल तर हळदीचं दूध प्यायल्याने आराम मिळतो. अशा वेळेस रोज झोपण्यापूर्वी हळदीचं दूध प्यायल्याने फायदा होतो.
३.सुंदर त्वचा : दूध प्यायल्याने त्वचेत एक चमक निर्माण होते. दुधासोबत हळदी सेवन केल्याने त्वचेच्या विकारापासूनही बचाव होतो. खाज, इंफेक्शन या सारख्या गोष्टींपासून संरक्षण होते.
४. सर्दी : सर्दी किंवा कफ यासारख्या विकारांवर हळदीयुक्त दूध अधिक फायदेशीर ठरतं. गरम दूध प्यायल्याने कप निघून जातो. थंडीमध्ये हळदीचे दूध प्यायल्याने यापासून तुमचा बचाव होतो.
५. मजबूत हाडे : दूध आणि हळद यामुळे आपल्या शरिरातील हाडे अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. तसेच रोग प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होती.
६. झोप न येणे : झोप न येणे ही अनेकांची समस्या असते. पण जेवणानंतर हळदीयुक्त दूध प्यायल्याने तुम्हाला चांगली झोप येईल.
७. पचन : हळद युक्त दूध घेतल्यामुळे पचनासंबंधी ज्या काही तक्रारी असतील तर त्या दूर होतात. अल्सर आणि कोलाइटिस बरे करण्यास मदत करते. अल्सर, डायरिया आणि अपचन समस्या दूर होतात.
८. श्वास घेण्यास त्रास : श्वास घेण्याबाबात ज्या काही तक्रारी असतील तर त्या दूर होण्यास मदत होती. फेफडा, कफ यावर तत्काळ आराम पडतो.
९. वजन कमी करणे : हळद टाकलेले दुध घेतल्यामुळे आपल्या शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते. कॅल्शिअम आणि मिनिरल तसेच पोषक तत्व वजन कमी करण्यासाठी मदत करते.
१०. ब्लड शुगर : आयुर्वेदात हळदीला महत्व दिले गेले आहे. हळदीमुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते आणि ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहतो. तसेच रक्त अधिक पातळ करण्यास मदत करते.

Previous articleरमाई जयंतीनिमित्त राज्यात पहिल्यांदा उच्चशिक्षीत महिलांचे अभिवादन रमाईच्या स्मरणार्थ मुस्लीम मुलींना अधिकारी करणार- दिपक कदम
Next articleगृहनिर्माण आणि शहरी विभाग मंत्रालयाच्या वतीने राहणीमान सर्वेक्षणसुरु ! पिंपरी चिंचवड शहराला अव्वल स्थानांकन प्राप्त व्हावे-आयुक्त हर्डीकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 + three =