Home ताज्या बातम्या माता रमाई भिमराव आंबेडकर कोट्यावधी लोकांची सांस्कृतीक आई झाली -भिमाताई तुळवे

माता रमाई भिमराव आंबेडकर कोट्यावधी लोकांची सांस्कृतीक आई झाली -भिमाताई तुळवे

0

देहुरोड,दि.९फेब्रुवारी २०२०(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
रमाई महिला मंच(महा.राज्य),ऐतिहासिक बुद्ध विहार ट्रस्ट देहूरोड,भारतीय बौद्ध महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाई जयंती महोत्सवाचे आयोजन रविवार दि.९ फेब्रुवारी २०२०रोजी दिवसभर धम्मभूमी,देहूरोड येथे करण्यात आले होते,या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा व रमाई महिला मंच-अध्यक्षा, भिमाताई तुळवे बोलताना म्हणाले रमाईच्या जीवनाची घटना क्रम पहा खर्‍या अर्थाने जगण्याचे सामर्थ्य मिळेल बाबासाहेबांचा खरा अधार सावली रमाई होती माता रमाई भिमराव आंबेडकर कोट्यावधी लोकांची सांस्कृतीक आई झाली.
स्वागतध्यक्षा राजश्रीताई जाधव यांनी स्वागतपर भाषण केले,व प्रास्तावीक भाषण अॅड.अशोक रुपवते यांनी १९६६ पासुन ते २०१९ पर्यतचा विहाराच्या घडामोडी वर मत व्यक्त करत माहिती दिली.सकाळ पासुन रमाई महिला मंच च्या वतीने रक्तदानाचा कार्यक्रम घेण्यात आला,मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला,पिंपरी सर्जिकल इनस्टीट्युट ब्लड बँक-काळेवाडी पिंपरी यांची टीम होती,या मध्ये डाॅ.व्यंकटेश तपशीलकर,सदानंद नाईक,दिपक पाटिल,मंगेश सुरवसे,अमोल जंगगुडे,पुजा कांबळे,सुनीता जेवलेवड,जुनेद शेख,शुभम सालेकर उपस्थित होते.बुद्ध वंदना व परित्रान पाठ, भारतीय बौद्ध महासभा देहुरोड शहर यांच्या वतीने घेण्यात आले भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन, मनिषाताई साळवे व साधनाताई मेश्राम यांनी करुन घेतले.माता रमाईंच्या जीवणावर-रमाताई अहिरे, मुंबई,यांचे व्याख्यान झाले,त्यानी रमाईच्या जीवनातील संघर्षाची आठवण करुन दिली. शारदाताई मुंडे यांचे मी रमाई बोलते हे एकपाञी नाटक झाले,नाटकाच्या शेवटी प्रेक्षकांचे डोळे पानावले रमाईचा संघर्ष ह्या एकपाञी प्रयोगातुन पाहण्यास मिळाला तसेच रमाई महिला मंच च्या वतीने मुकनायक शताब्दी वर्ष व माता रमाई जयंती निमित्त डाॅ बाबासाहेब पञकारीता पुरस्काराने पत्रकार विकास कडलक – प्रजेचा विकास संपादक व लॉर्ड बुद्धा चॅनेल चे पुणे जिल्हा प्रतिनिधी,कलिंदर शेख – निर्भिड पत्रकार प्रतीनिधी, अनीस शेख – आय,बी.एन.लोकमत,दिलीप देहाडे लोकहिताय न्युज व इतर १२ पञकारांना सन्मानीत करण्यात आले
तर सूत्रसंचालन – जयश्री शिरसाट व आभार प्रदर्शन – सुमेध भोसले ट्रस्टी यांनी केले या वेळी मंदाताई गायकवाड, विमल प्रधान, उषा वाघमारे, मनिषाताई साळवे, वंदनाताई सोनवणे, अरुणा कांबळे, शकुंतला गायकवाड,वेणूताई गायकवाड, प्रतिभाताई थोरात,बबिता चक्रनारायण, शिल्पा नितनवरे, सरलाताई उपवट, निता दांडेकर, मिलनताई भालेराव, राधाताई कुचेकर,चंद्रभागा देडे, संगीता गाडे, शोभा गायकवाड,अनिता गायकवाड, छबुताई शिंदे, वंदना सोनवणे, रेषमा अत्तार, फातिमा शेख, बविता कांबळे, सरस्वती वावळे, सुनंदा खरात, मीना हिवाळे, नंदा शिंदे, अनिता तुलकमारे, सिमाताई भालेसीन, कौशल्या सोनवणे,अलकाताई कडलक, संगीता ओहाळ, निर्मला चव्हाण, रत्नप्रभा चोपडे, बंदना भोसले, उषा लांडगे, इंदुमती खरात, शामा जाधव, सुनंदा खरात, अनुसया कांबळे, संजनानाई गायकवाड, मालन मनसोडे, सुजाता निकाळजे,साधना मोरे, माई गायकवाड, विराडे ताई.विद्या गायकवाड, सारिका सोनवणे, छाया कडलक, शिला मनोरे, डॉ. लिना सोनवणे, मीराताई जाधव, शारदा गायकवाड, ज्योती पाटील, सुवर्णा जेतवन, निता गजभिये, आशा कुरणे, मंगल कडलक, मिना कडलक, माधुरी शिवशरण, वंदना भोसले,प्रियाताई ठाकरे, अंजना गायकवाड, अनिता चव्हाण, अनिता सोनवणे, रंजना कांबळे, सुनीता शिंदे, राधा कांबळे, शकुंतला गायकवाड, सुमन ठोकळ,शिल्पा इंगळे, सुनिता ससाने, पुष्पा सोनवणे, सुनीता कांबळे,सुमन भालेराव, आशा गायकवाड, देउवाई रोकडे. ताराबाई भालेराव, हिराबाई राक्षे, सितल रोकडे, सुवर्णा कांबळे, राधिका आल्हाट,अरुणा बबळे, अनीता लोखंडे, अरुणा रणदिवे, सुरेखा वाघमारे, पौर्णिमा वाघमारे, विमल ओहाळे, सुनीता आष्टांग, कविता शेलार, माया सोनवणे, अंजना माने,तसेच देवेंद्र तायडे, अध्यक्ष वंचीत बहुजन आघाडी,पिं.चिं.व बुद्ध विहार ट्रस्ट, देहूरोडचे – अॅड. गुलाबराव चोपडे – कार्याध्यक्ष, अॅड. अशोक रुपते – सचिव, सुमेध भोसले – सहसचिव, संजय ओव्हाळ – खजिनदार, सुनील कडलक,चंद्रकांत भालेराव, वंचित बहुजन आघाडीचे दीपक भालेराव, अंकुश कानडी भारतीय बौद्ध महासभा – बापूसाहेब गायकवाड ,भारतीय बौद्ध महासभा देहुरोड शहर अध्यक्ष – संजय आगळे,अप्पु उर्फ यल्लेश शिवशरण,प्रकाश गायकवाड, मधुकर रोकडे, गौतम सोनवणे, सिद्धार्थ चव्हाण,दिलिप कडलक, हौसराव शिंदे, राजू गायकवाड, मच्छिंद्र कदम,अशोक कदम,सुरेश गोपाळ भालेराव, के. एच.सूर्यवंशी,कांताभाऊ कांबळे,कुणाल गायकवाड,बनसोडे,आदी.व पंच क्रोषीतील उपासक उपासिका रमाई महिला मंच चे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

Previous articleमनसेने भाजपला ‘इंजिन’ भाड्याने दिलेय; काँग्रेसची बोचरी टीका
Next articleहिंगणघाट जळीतकांडातील पीडित शिक्षिकेची मृत्यूशी झुंज अखेर संपली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × 3 =