Home ताज्या बातम्या दत्ता साने यांनी आयोजित केली शास्तीकर बाधितांची रविवारी बैठक

दत्ता साने यांनी आयोजित केली शास्तीकर बाधितांची रविवारी बैठक

90
0

पिंपरी,दिि.20 डिसेंबर 2019(प्रजेेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात हजारो अनधिकृत बांधकामे आहेत. या अनधिकृत व वाढीव बांधकामांना महानगरपालिकेने मिळकतकरामध्ये बेकायदेशीरपणे शास्तीकर आकारला आहे. याबाबत आतापर्यंत अनेक राजकीय पक्षांनी व नागरिकांनी आंदोलने व निदर्शने केली आहेत. सर्वच राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्यात देखील शास्तीकरा माफीबाबत निर्णय घेऊ असे, आश्वासन देण्यात आले होते. मात्र, युती सरकारच्या कार्यकालात इच्छाशक्ती अभावी शास्तीकर माफीचा अंतिम निर्णय होऊ शकला नाही. शास्तीकराबाबत निव्वळ राजकारणच केले जाते. भाजपच्या पदाधिका-यांनी व शहरातील आमदारांनी शास्तीकर माफ केला अशी नागरिकांची दिशाभूल करून अनेकदा साखर, पेढे वाटून स्वत:ची जाहिरात करून प्रसिद्धी मिळवली. मात्र, शहरातील गोर, गरीब कष्टकरी कामगार मिळकतधारक शास्तीकर माफीच्या लाभापासून वंचित राहिला. या सर्व बाधितांना आता न्यायालयातूनच न्याय देऊ असा निर्धार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांनी केला आहे.

यानिमित्त शहरातील सर्व शास्तीकर बाधितांची बैठक रविवारी (दि. 22) दुपारी 4 वाजता आकुर्डीतील खंडोबा माळ मंदिरा शेजारील मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. यावेळी शास्तीकर बाधित नागरिकांनी मिळकतकर पावती, किंवा मिळकतकर भरण्याबाबतची नोटीस प्रत्येकी दोन प्रती घेऊन उपस्थित रहावे असे आवाहन दत्ता साने यांनी केले आहे.

Previous articleपिंपरी चिंचवड शहारात कुल जमाअती तंजीम संघटनांच्या वतीने CAA कायदा व प्रस्तावित NRC कायदा विरोधात मोठ्या प्रमाणात झाले आंदोलन
Next articleदेशावर बाहेरची ओझी नको; भारत म्हणजे धर्मशाळा नव्हे- राज ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × one =