Home ताज्या बातम्या उद्याच्या उद्या बहुमत घ्या, गुप्त मतदान नको; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

उद्याच्या उद्या बहुमत घ्या, गुप्त मतदान नको; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

205
0

नवी दिल्ली,दि.26 नोव्हेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-
महाराष्ट्रामधील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. राज्यामधील घोडेबाजार थांबवण्यासाठी लवकरात लवकर बहुमत चाचणी घेणे गरजेचे असल्याचे सांगत न्यायलयाने उद्या म्हणजेच २७ नोव्हेंबर रोजी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. उदा पाच वाजेपर्यंत आमदारांचे शपथविधी पूर्ण करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच या मतदानाचे लाइव्ह टेलिकास्ट करण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत.
“लोकशाही मूल्यांचं संरक्षण होणं आवश्यक आहे. लोकांना चांगलं सरकार मिळणं हा मुलभूत अधिकार असून, न्यायालयाला काही आदेश देणं गरजेचे आहे. तसेच घोडेबाजार रोखण्यासाठी न्यायालयाला काही आदेश देणे गरजेचे आहे. त्यामुळे कोणतेही गुप्त मतदान न घेता उद्या (२७ नोव्हेंबर) पाच वाजेपर्यंत बहुमत चाचणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालय देत आहे”, असं न्यायाधिशांनी स्पष्ट केलं बहुमतासाठी घेण्यात येणारे मतदान हे गुप्त पद्धतीने न घेता ते थेट घेण्यात यावे तसेच या मतदानाचे लाइव्ह टेलिकास्ट करण्यात यावे असंही न्यायलयाने स्पष्ट केलं आहे. संबंधित निकाल देताना न्यायलयाने बहुमत चाचणीसाठी हंगामी व स्थायी अध्यक्षांची नेमणूक करून आमदारांना शपथ देण्याचे आदेश दिले आहेत.
राज्यपालांनी देवेंद्र फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यास पाचारण करण्याचा निर्णय बेकायदा असल्याचा मुद्दा उपस्थित करत या निर्णयाला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात पुन:विचार याचिका दाखल केली होती. याच याचिकेवर रविवारी आणि सोमवारी न्यायलयाने दोन्ही बाजूकडील युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर आज यासंदर्भातील महत्वपूर्ण निर्णय दिला. न्या. एन. व्ही. रमण, न्या. अशोक भूषण आणि न्या. संजीव खन्ना यांच्या तीन सदस्यीय खंठपीठाने हा निर्णय दिला आहे.

Previous articleअजित पवारांच्या बंडाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात, अनेक ठिकाणी निषेध
Next articleमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार म्हणुन ‘सामना’चे संपादक पद उद्धव ठाकरेंनी सोडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × three =