मंबई,दि.23 नोव्हेबंर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-अजित पवार यांनी घेतलेला निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाविरोधातला आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. अजित पवार फुटून जातील असं कधीही वाटलं नव्हतं असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसंच अशा फाटाफुटीतून मी गेलो आहे असंही पवार यांनी म्हटलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटर या ठिकाणी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं. महाराष्ट्रात जनमत जे आहे ते भाजपाच्या विरोधात आहे. असं असताना त्यांच्यासोबत जाण्याच्या निर्णयाला जनता पूर्ण विरोध दर्शवेल असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. १० ते ११ सदस्य त्यांच्यासोबत गेल्याचं समजतं आहे. जे अपात्र होतील त्यांच्याविरोधात आम्ही तीन पक्ष काय करायचं ते करु असंही पवार यांनी सांगितलं.
देशात पक्षांतर बंदीचा कायदा करण्यात आला आहे हे अनेकांना माहित नसावं. त्यामुळे नंतर जी कारवाई होईल त्यासाठी आम्ही योग्य ती कारवाई करु. भाजपाला बहुमत सिद्ध करता येणार नाही. त्यानंतर आम्ही सरकार स्थापन करु असंही पवार यांनी म्हटलं आहे. आम्ही एकत्र होतो, आहोत आणि राहू असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. राज्यात सत्तास्थापनेच्या दृष्टीने ज्या काही गोष्टी घडल्या त्यानंतर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिलीमहाराष्ट्रात सक्षम सरकार बनावं यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र आले होते. बहुमताचा आकडा तिन्ही पक्षांकडे होता. शिवसेनेचे ५६, राष्ट्रवादीचे ५४ तर काँग्रेसचे ४४ अशी संख्या होती. शिवसेनेला काही अपक्षांनीही साथ दिली होती. १७० च्या आसपास आमची आमदारसंख्या जात होती. काल आमची बैठक पार पडली. या बैठकीत काही प्रश्नांबाबत चर्चा राहिली होती. मात्र सकाळी आम्हाला राजभवनावर राज्यपालांकडे आणण्यात आलं आहे. अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखाली काही सदस्य तिथे गेल्याचंही समजलं. मुख्यमंत्रीपदाची शपथ देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ अजित पवारांनी घेतली. अजित पवारांचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाच्या विरोधातला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
आम्ही दिवसाढवळया राजकारण करतो, रात्रीस खेळ चाले आमच्याकडे नाही – उद्धव ठाकरे
महाराष्ट्राच्या राजकारणात नाटयमय घडामोडी वेगाने घडत आहे.आम्हाला खंजीर खुपसाणारे नी आम्हाच्या महाराष्र्टाच्या पाठीत खंजीर खुपसले आहे,हा शिवरायांचा महाराष्र्ट आहे धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही.
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी मांडलेले मुद्दे
– जनादेशाच अनादर केल्याचा आमच्यावर आरोप होतो पण शिवसेना जे काही करते ते उघडपणे करते
– आम्ही दिवसाढवळया राजकारण करतो, रात्रीस खेळ चाले आमच्याकडे नाही.
– मी पणा विरुद्ध ही लढाई आहे.
– पाठित वार करण्याचा प्रयत्न करु नका.
– शिवरायांच्या महाराष्ट्रावर केंद्राने सर्जिकल स्ट्राइक केला.