Home औरंगाबाद ऊसतोड कामगारांच्या मुलांना आणले शिक्षणाच्या मूळ प्रवाहात।

ऊसतोड कामगारांच्या मुलांना आणले शिक्षणाच्या मूळ प्रवाहात।

45
0

वैजापुर,दि.१३नोव्हेंबर २०१९(प्रजेचा विकास प्रतिनिधी-राहुल ञिभुवन): बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर,वैजापुर तालुक्यातील बोरसर केंद्रातर्गत येणारी जि. प.शाळा सुदामवाडी येथील उपक्रमशील शिक्षक श्री.मनोज सोनवणे सर नेहमीच शालेय, सामाजिक व धार्मिक प्रगतीच्या बाबत चर्चेचा विषय ठरले आहेत। खंडाळा पंचक्रोशीतील व्याख्याता म्हणून त्यांचा नावलौकिक आहे। अत्यंत कर्तव्यदक्ष, आदर्श व्यक्तीमत्व असलेले मनोजकुमार सोनवणे सर यांनी दिवाळीच्या सुट्टीनंतर आज शाळेचा पहिलाच दिवस,शिक्षणाची जाण असल्यामुळे ऊसतोड कामगाराच्या मुलांचे ऊसतोडीला होणारे स्थलांतर रोखण्यासाठी आणि दिवाळीनिमित्त गरजूंच्याही चेहऱ्यावर आनंद फुलण्यासाठी सुदामवाडी शाळेचे शिक्षक मनोजकुमार सोनवणे सर यांच्या विनंतीला मान देऊन खंडाळा, ता.वैजापूर चे प्रतिष्टीत व्यापारी मा. संतोषशेठ कासलीवल यांनी आपले वडील कैलासवासी धंन्नालाल कासलीवल यांच्या स्मरणार्थ 12 हजार रु किंमतीचे सुमारे 30 नवीन ड्रेस चे वाटप सुदामवाडी येथील शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांना केले.
याप्रसंगी सचिन बाफना,अरुण शिंदे,शाळेचे मुख्याध्यापक संजय शिंदे,संजय जाधव,सुनील सोनवणे,सुयोग बोराडे, रामदास पवार,ज्योती निकम,मनोज सोनवणे,तसेच शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, उपाध्यक्ष चांगदेव पवार,उपसरपंच राजेंद्र सोनवणे,राधाकिसन दादा शेवाळे, पोलिस पाटिल मोहन सोनवणे, देविदास होले ,सचिन भाऊ आणि अरुण भाऊ शिंदे इत्यादी मंडळी उपस्थित होती तसेच खरे लाभार्थी शोधण्याचे काम करणारे नितीन शेवाळे,शुभम शेवाळे यांचा याप्रसंगी विशेष सत्कार करण्यात आला। कार्यक्रम पार पाडण्यासाठी सुदामवाडी शाळेचे मुख्याध्यापक व उपक्रमशील शिक्षक यांचे सहकार्य लाभले।

Previous articleमोठी बातमी: राज्यपालांकडून सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला विचारणा दिला २४ तासांचा वेळ
Next articleआंबेडकरवादी मिशन नांदेड अॅडमिशनसाठी MPSC/UPSC स्पर्धा परिक्षा राज्यस्तरीय प्रवेशपुर्व परीक्षा २५ डिसेंबरला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × 2 =