Home ताज्या बातम्या रिपब्लिकन पक्षातून दिपक निकाळजे निलंबित – राजाभाऊ सरवदे

रिपब्लिकन पक्षातून दिपक निकाळजे निलंबित – राजाभाऊ सरवदे

0

मुंबई,दि.10 नोव्हेंबर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-रिपब्लिकन पक्षाचे राज्य उपाध्यक्ष दिपक निकाळजे यांना पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपाइंतून निलंबित करण्यात आले असल्याची अधिकृत घोषणा रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी केली आहे.
दिपक निकाळजे यांच्या विरुद्ध अनेक तक्रारी पक्षाला प्राप्त झाल्या आहेत. ते रिपब्लिकन पक्षाविरुद्ध भूमिका घेऊन पक्ष विरोधी काम करीत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. त्यांच्या विरुद्ध काही गंभीर आरोपांची तक्रार रिपब्लिकन पक्षाकडे आली आहे.
त्यामुळे दिपक निकाळजे यांना रिपब्लिकन पक्षातून निलंबित करण्यात येत असल्याची अधिकृत घोषणा रिपाइंचे राज्य अध्यक्ष भुपेश थुलकर, कार्याध्यक्ष बाबुराव कदम आणि सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

11 + 20 =