Home ताज्या बातम्या देहूरोड परिसरात सुनिल शेळकेंच्या पदयात्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद

देहूरोड परिसरात सुनिल शेळकेंच्या पदयात्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद

36
0

देहूरोड , दि. 16 ऑक्टोबर 2019 (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- मावळ मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, एसआरपी, मित्रपक्ष महाआघाडीच्या उमेदवार सुनिल शेळके यांचा बुधवारी देहूरोड भागात प्रचार दौरा झाला. यावेळी आयोजित पदयात्रांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्यने त्यात सामीलही झाले.
सकाळच्या सत्रात शेलारवाडी, इंद्रायणी दर्शन, साई नगर, गहुंजे, थॉमस कॉ, मामुर्डी, शितळा नगर, मेहता पार्क,  या भागातुन पदयात्रा काढण्यात आली. मामुर्डी येथे सुनील शेळके यांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी फुलांच्या वर्षावात फटाक्यांची आतिषबाजी करून शेळके यांचे स्वागत करण्यात आले. 
याप्रसंगी माजी मंत्री मदन बाफना, तळेगावचे नगरसेवक किशोर भेगडे,  देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष ऍड. प्रवीण झेंडे, यदुनाथ डाखोरे, काँग्रेसचे कार्याध्यक्ष दीपक साई, उपाध्यक्ष व्यंकटेश कोळी, जावेद शकीलकर, काँग्रेसच्या महिलाध्यक्ष ज्योती वैरागर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलाध्यक्ष शीतलताई हगवणे, रिपब्लिकन पक्षाचे कावडे गटाचे शहराध्यक्ष परशुराम दौडमनी, मनसेचे ज्येष्ठ नेते मोझेस दास, मनसेचे शहराध्यक्ष जॉर्ज दास, एसआरपी देहूरोड शहराध्यक्ष जावेद शेख तसेच गणेश कोळी, मिकी कोचर, योगेश दाभोळे, रेणू रेड्डी, बाळूअण्णा पिंजण, यशोदा भंडारी, राष्ट्रवादी काँग्रेस देहूरोडचे पदाधिकारी जालिंदर राऊत, धनंजय मोरे,  रोहिदास राऊत, वैभव राऊत, काँग्रेसचे मोहन राऊत, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय राऊत यांच्यासह शिवशक्तीतरुण मित्र मंडळ, जयभवानी तरुण मित्र मंडळ, अमर मित्र मंडळ, काका हलवाई मित्र मंडळ, जोगेश्वरी देवी उत्सव समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. 
शेलारवाडीच्या पदयात्रेत सतीश भेगडे, संजय माळी, योगेश माळी, साईनाथ शेलार, प्रदीप चांदेकर, संजय शेलार, माऊली बालघरे तसेच शिवतेज ग्रुप, संत सावतामाळी मित्र मंडळाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. गहुंजे येथे उमेश बोडके, लखन बोडके, विक्रम बोडके, माऊली बोडके तर मामुर्डी येथे रोहिदास राऊत, मोहन राऊत, दत्तात्रय राऊत, स्वप्नील राऊत, वैभव राऊत आदींनी शेळके यांचे स्वागत केले.  

शितळा नगर चौकातही सुनील अण्णांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे देहूरोड शहराध्यक्ष ऍड. कृष्णा दाभोळे, देहूरोड काँग्रेसचे  अध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू, उपाध्यक्ष शंकर नायडू, विशेष कार्यकारी अधिकारी वसीम मणियार, पार्वती बाबू, गंगुताई खरेकर, सामाजिक कार्यकर्ते राजू मारीमुत्तू,  प्रवीण झेंडे, धीरज नायडू आदी यावेळी उपस्थित होते. 
शेळके यांनी यावेळी मतदारांशी संवाद साधला. नागरिकांनीही मोकळेपणाने आपल्या अडचणी शेळकेंना सांगितल्या. एक वेळ संधी द्या, इथल्या समस्या पूर्ण संपवेन, अशी ग्वाही सुनिल अण्णांनी नागरिकांना दिली. 

बरलोटा नगर येथे सुनील शेळकेंच्या पदयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. महिलावर्गाकडून त्यांचे औक्षण करण्याची चढाओढ दिसून आली. सर्व नागरिकांशी मनमोकळा संवाद साधताना सुनील अण्णांनी निवडून आल्यानंतर लगेचच या भागातली प्रलंबित कामे पूर्ण करून देणार असल्याचे आश्वासन दिले. यापुढे नागरिकांना समस्यांना सामोरे जावे लागणार नाही, असे ते म्हणाले. यावेळी नागरिकांनीही आपले पूर्ण समर्थन सुनील अण्णांना असून त्यांनाच मत देणार असल्याचे जाहीर केले. याप्रसंगी प्रसाद निम्हण, डेव्हिड नागर, निखिल मुळे, के.सी. बिर्लान, संतोष कुमार, तुळशीराम गायकवाड आदी सामाजिक कार्यकर्ते, बरलोटा नगर महिला मंडळाच्या सदस्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
दुपार आणि सायंकाळच्या सत्रात पंडित चाळ, गारुडी वस्ती, गांधी नगर, राजीव गांधी नगर, आंबेडकर नगर, अशोक नगर, सर्वत्र नगर, पोर्टर चाळ, सुभाष चौक, पारशी चाळ, इंद्रप्रस्थ सोसायटी आदी भागातून सुनील शेळके यांचा प्रचार दौरा पार पडला.  

Previous articleबाळासाहेब आंबेडकरांच्या सभेच्या स्टेज वर भोसरी विधानसभेचे उमेदवार शहानवाज शेख यांचा फोटो गायब
Next articleनिवडणूक मावळची, मुद्दा काश्मीरचा, मुख्यमंत्री उत्तर प्रदेशचा..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fifteen + fourteen =