Home पिंपरी-चिंचवड पुन्हा विकासाशी नाळ जोडणार, कपबशीलाच विजयी करणार – माजी नगरसेवक वाळके

पुन्हा विकासाशी नाळ जोडणार, कपबशीलाच विजयी करणार – माजी नगरसेवक वाळके

103
0

भोसरी ,दि 10 आॅक्टोबंर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- भोसरी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार विलास लांडे यांनी डोंगराएवढी विकासकामे केली आहेत. लांडे हे दहा वर्षे आमदार असतानाच मतदारसंघात सर्वाधिक विकास झाला आहे. दिघी परिसरातील रस्ते आणि इतर नागरी सुविधा या माजी आमदार लांडे यांच्या पाठपुराव्यामुळेच येथील नागरिकांना उपलब्ध झाल्या आहेत. आज कोणी कितीही बढाया मारत असले, तरी दिघी आणि परिसरातील नागरिक विलास लांडे यांनी या भागातील विकासासाठी दिलेले योगदान विसरलेले नाहीत. त्यामुळे निवडणुकीत कपबशीला म्हणजे विलास लांडे यांचाच विजय निश्चित असल्याचा विश्वास माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके यांनी गुरूवारी (दि. १०) व्यक्त केला.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी गुरूवारी संपूर्ण दिवसभर दिघी परिसरात पदयात्रा काढून ग्रामस्थ व नागरिकांशी संवाद साधला. सकाळी नऊ वाजता सुरू झालेली ही पदयात्रा रात्री साडेसात वाजता संपली. सकाळी गावातील मारूती मंदिरात दर्शन घेऊन लांडे यांनी पदयात्रेला सुरूवात केली. त्यामध्ये माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके, संजय धुमाळ, वसंत इंगळे, ज्ञानेश्वर आल्हाट, सचिन डुवळे, राजेंद्र ढवळे, संतोष बबन वाळके, प्रभाकर कदम, हरिभाऊ लबडे, सुधाकर भोसले, अरविंद हेलपल्ले, विलास पाटील, तानाजी देशमुख, लक्ष्मण पाटील, राजेंद्र वाळके, संदिप वाळके, शशिकांत वाळके, सुर्यकांत वाळके, पुंडलिक सैंदाणे, गोपीनाथ रोमन, सुरेंद्रसिंग अहिर, विलास भोसले सर, रमेश जमदाडे, ज्ञानेश्वर वाळके यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके म्हणाले, “माजी आमदार विलास लांडे यांची दिघीकरांसोबत असलेली विकासकामांची नाळ पाच वर्षांपूर्वी तुटली. ती आमची चूक ठरली आहे. पाच वर्षांचा विरोधकांचा काळ अनुभवल्यानंतर दिघीकरांना आता पश्चात्ताप होत आहे. या भागातील नागरिकांवर विकासाच्या नावाखाली केवळ भुलथापा ऐकण्याची वेळ आली आहे. विरोधक कामे न करता काम केल्याचे सांगून कसे फसवतात याचा दिघीकरांना चांगलाच अनुभव आला आहे. आता दिघीकरांना आपली नाळ पुन्हा विकासासोबत जोडण्याची संधी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्राप्त झाली आहे. या भागाचा विकास करण्याची धमक फक्त विलास लांडे यांच्यामध्येच आहे. त्यामुळे दिघी आणि परिसरातील नागरिक मतदानाच्या दिवशी कपबशी या चिन्हांसमोरील बटन दाबून विलास लांडे यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवणार असल्याचे वाळके यांनी सांगितले.”

दरम्यान, विलास लांडे यांनी दिघी भागातील घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांशी संवाद साधला. महिला, ज्येष्ठ नागरिक, तरूण या सर्वांसोबत त्यांनी वैय्यक्तिक चर्चा केली. आपली विकासाची भूमिका स्पष्ट करताना लांडे यांनी कपबशी चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन सर्वांना केले. दहा वर्षे आमदार असताना दिघी भागात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा त्यांनी नागरिकांसमोर मांडला. मी दहा वर्षात केलेली विकासकामे आणि विरोधकांनी पाच वर्षांत केलेला विकासाचा दिखावा हे डोळसपणे पाहा, असा सल्ला त्यांनी नागरिक व ग्रामस्थांना दिला. आमदार असताना पाठपुरावा करून दिघी भागातील रस्त्यांची कामे केल्याने पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसराशी तातडीने दळणवळण करणे शक्य झाले.

दयात्रेदरम्यान विलास लांडे यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. काही भागात महिलांनी रांगोळी काढून त्यांचे स्वागत केले. तसेच ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले. दिघीगावातील मारूती मंदिरापासून सुरू झालेली ही पदयात्रा पुढे मराठी शाळा, जकात नाका, आळंदी रोड, विठ्ठल मंदिरात दर्शन पुढे डाबीशेठ चौक, पाटील आळी, जुना चऱ्होली रस्ता, रूनवाळ चौक, संभाजीनगर, विजयनगर, विनायक पार्क, सिद्धार्थनगर, माऊलीनगर, साई पार्क, सैनिक कॉलनी, महाराष्ट्र कॉलनी, यमाईनगर, शिवनगरी, आदर्शनगर, भारतमातानगर, दत्तनगर परिसरात पदयात्रेचा समारोप करण्यात आला. 

भोसरी विधानसभा मतदारसंघात माजी आमदार विलास लांडे यांनी डोंगराएवढी विकासकामे केली आहेत. लांडे हे दहा वर्षे आमदार असतानाच मतदारसंघात सर्वाधिक विकास झाला आहे. दिघी परिसरातील रस्ते आणि इतर नागरी सुविधा या माजी आमदार लांडे यांच्या पाठपुराव्यामुळेच येथील नागरिकांना उपलब्ध झाल्या आहेत. आज कोणी कितीही बढाया मारत असले, तरी दिघी आणि परिसरातील नागरिक विलास लांडे यांनी या भागातील विकासासाठी दिलेले योगदान विसरलेले नाहीत. त्यामुळे निवडणुकीत कपबशीला म्हणजे विलास लांडे यांचाच विजय निश्चित असल्याचा विश्वास माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके यांनी गुरूवारी (दि. १०) व्यक्त केला.

भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विलास लांडे यांनी गुरूवारी संपूर्ण दिवसभर दिघी परिसरात पदयात्रा काढून ग्रामस्थ व नागरिकांशी संवाद साधला. सकाळी नऊ वाजता सुरू झालेली ही पदयात्रा रात्री साडेसात वाजता संपली. सकाळी गावातील मारूती मंदिरात दर्शन घेऊन लांडे यांनी पदयात्रेला सुरूवात केली. त्यामध्ये माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके, संजय धुमाळ, वसंत इंगळे, ज्ञानेश्वर आल्हाट, सचिन डुवळे, राजेंद्र ढवळे, संतोष बबन वाळके, प्रभाकर कदम, हरिभाऊ लबडे, सुधाकर भोसले, अरविंद हेलपल्ले, विलास पाटील, तानाजी देशमुख, लक्ष्मण पाटील, राजेंद्र वाळके, संदिप वाळके, शशिकांत वाळके, सुर्यकांत वाळके, पुंडलिक सैंदाणे, गोपीनाथ रोमन, सुरेंद्रसिंग अहिर, विलास भोसले सर, रमेश जमदाडे, ज्ञानेश्वर वाळके यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

माजी नगरसेवक चंद्रकांत वाळके म्हणाले, “माजी आमदार विलास लांडे यांची दिघीकरांसोबत असलेली विकासकामांची नाळ पाच वर्षांपूर्वी तुटली. ती आमची चूक ठरली आहे. पाच वर्षांचा विरोधकांचा काळ अनुभवल्यानंतर दिघीकरांना आता पश्चात्ताप होत आहे. या भागातील नागरिकांवर विकासाच्या नावाखाली केवळ भुलथापा ऐकण्याची वेळ आली आहे. विरोधक कामे न करता काम केल्याचे सांगून कसे फसवतात याचा दिघीकरांना चांगलाच अनुभव आला आहे. आता दिघीकरांना आपली नाळ पुन्हा विकासासोबत जोडण्याची संधी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्राप्त झाली आहे. या भागाचा विकास करण्याची धमक फक्त विलास लांडे यांच्यामध्येच आहे. त्यामुळे दिघी आणि परिसरातील नागरिक मतदानाच्या दिवशी कपबशी या चिन्हांसमोरील बटन दाबून विलास लांडे यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवणार असल्याचे वाळके यांनी सांगितले.”

दरम्यान, विलास लांडे यांनी दिघी भागातील घरोघरी जाऊन प्रत्येक नागरिकांशी संवाद साधला. महिला, ज्येष्ठ नागरिक, तरूण या सर्वांसोबत त्यांनी वैय्यक्तिक चर्चा केली. आपली विकासाची भूमिका स्पष्ट करताना लांडे यांनी कपबशी चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन सर्वांना केले. दहा वर्षे आमदार असताना दिघी भागात केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा त्यांनी नागरिकांसमोर मांडला. मी दहा वर्षात केलेली विकासकामे आणि विरोधकांनी पाच वर्षांत केलेला विकासाचा दिखावा हे डोळसपणे पाहा, असा सल्ला त्यांनी नागरिक व ग्रामस्थांना दिला. आमदार असताना पाठपुरावा करून दिघी भागातील रस्त्यांची कामे केल्याने पिंपरी-चिंचवड आणि पुणे परिसराशी तातडीने दळणवळण करणे शक्य झाले.

दयात्रेदरम्यान विलास लांडे यांचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले. काही भागात महिलांनी रांगोळी काढून त्यांचे स्वागत केले. तसेच ठिकठिकाणी महिलांनी त्यांचे औक्षण केले. दिघीगावातील मारूती मंदिरापासून सुरू झालेली ही पदयात्रा पुढे मराठी शाळा, जकात नाका, आळंदी रोड, विठ्ठल मंदिरात दर्शन पुढे डाबीशेठ चौक, पाटील आळी, जुना चऱ्होली रस्ता, रूनवाळ चौक, संभाजीनगर, विजयनगर, विनायक पार्क, सिद्धार्थनगर, माऊलीनगर, साई पार्क, सैनिक कॉलनी, महाराष्ट्र कॉलनी, यमाईनगर, शिवनगरी, आदर्शनगर, भारतमातानगर, दत्तनगर परिसरात पदयात्रेचा समारोप करण्यात आला. 

Previous article‘मावळ का आमदार कैसा हो? सुनिल अण्णा जैसा हो !’ गुरुवारी अवघा मावळ परिसर घोषणांनी दमदुमला
Next articleवाकडमधील पिंपरी-चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचा महायुतीचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

4 × one =