Home ताज्या बातम्या जोरदार शक्तिप्रदर्शन करत शिवसेनेचे चाबुकस्वार यांनी भरला उमेदवारी अर्ज

जोरदार शक्तिप्रदर्शन करत शिवसेनेचे चाबुकस्वार यांनी भरला उमेदवारी अर्ज

58
0

पिंपरी,दि.३आक्टोबंर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-पिंपरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना भाजपा आरपीआय महायुतीचे उमेदवार ॲड. गौतम चाबुकस्वार यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
प्राधिकरणातील हेडगेवार भवन येथे आज दुपारी दिडच्या सुमारास आमदार चाबुकस्वार यांचे आगमन झाले. खासदार श्रीरंग बारणे, खासदार अमर साबळे, शिवसेना जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, भाजपच्या प्रदेश चिटणीस उमा खापरे, शिवसेनेचे पिंपरी विधानसभा संपर्क प्रमुख गिरीश सावंत, शहरप्रमुख योगेश बाबर, नगरसेवक प्रमोद कुटे आदी यावेळी उपस्थित होते.
सकाळी अकरा वाजता पिंपरी येथून दुचाकी रॅलीने शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते आकुर्डी येथील सेना भवन येथे जमा झाले. तेथून उघडया जीपमध्ये बसून आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार नागरिकांना अभिवादन करत निवडणूक कार्यालयात पोहोचले. यावेळी शिवसेना झिंदाबाद, उद्धव ठाकरे आगे बढो हम तुम्हारे साथ है, या गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

Previous articleवंचीत बहुजन आघाडीचे इच्छुक उमेदवार असलेले दिपक जगताप शुक्रवारी भरणार अपक्ष अर्ज
Next articleडॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील रिपब्लिकन पक्ष मजबूत करून राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळविणार – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eighteen + 8 =