Home अकोला सम्यक विद्यार्थी आंदोलन आयोजित भव्य नेत्र तपासणी शिबिर संपन्न

सम्यक विद्यार्थी आंदोलन आयोजित भव्य नेत्र तपासणी शिबिर संपन्न

0

अकोला,दि.६ सप्टेबंर २०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-दिपक दारोकार):-भारिप बहुजन महासंघ व वंचित बहुजन आघाडी प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलन अकोला महानगर प्रभाग क्र १८ मध्ये सम्यक विद्यार्थी आंदोलन महानगर महासचिव व प्रभागातील युवा नेतृत्व पवन गजानन गवई यांनी भव्य नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन शुक्रवार (ता.०६) रोजी मिलिंद विद्यालय कमला नगर येथे करण्यात आले होते.या शिबीराला प्रभागातील नागरीकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.या शिबीराला सकाळी ९ वाजता सुरुवात होऊन सायंकाळी ४ वाजेपर्यंत २३८ रुग्णांची नोंद करण्यात आली होती.या शिबिराचे उद्घाटन वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोदजी देंडवे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणुन अकोला मनपाचे मा.नगरसेवक तथा गटनेते गजानन गवई,जेष्ठ पत्रकार माणिकजी कांबळे,सम्राटजी सुरवाडे, डॉ.मनोहर घुगे, पाक्षिक प्रबुद्ध भारत जिल्हा संयोजक अमोल शिरसाठ, वंचितचे जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सचिनजी शिराळे, विकासजी सदाशिव,प्रभाकर पाखरे,डिबीएन गृपचे आकाश इंगळे,आनंद सोनोने, शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रा.शंतनु वानखडे सर,धोबी समाज नेते प्रा.राजेश्वर बुंदेले, डॉ.जाधव सर,राजकुमार तायडे,विशाल गवई,अश्विन गोपणारायन,वैभव गायकवाड,अक्षय शिरसाट यांच्यासह परिसरातील नागरीक उपस्थित होते. या शिबिराचे आयोजक पवन गजानन गवई यांनी नेत्रतज्ञ डॉ. उदय भटकर यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी परिसरातील युवक नागरिक तसेच नेत्ररुग्णांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 3 =