Home Uncategorized वाहतूक पोलिसांपासून बचाव करण्यासाठी तुम्हाला आहेत हे अधिकार

वाहतूक पोलिसांपासून बचाव करण्यासाठी तुम्हाला आहेत हे अधिकार

44
0


पिंपरी,दि.04 सप्टेबंर 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-  नविन मोटार वाहन अधिनियमन लागू झाल्यानंतर वाहतूकीचे उल्लघंन केल्यास मोठी रक्कम आता भरावी लागणार आहे. त्यामुळे हे नियम लागू झाल्यानंतर तुम्हाला ही वाहतूक नियमाबद्दल माहीती असणे आवश्यक आहे. वाहतूक पोलिस नविन नियामांचे काटेकोरपणे पालन करीत आहे. जर तुम्ही चुकीने ही वाहतूक नियमाचं उल्लघंन केलं तर तुम्हाला हजारो रुपयांचा दंड भरावा लागेल.  यासाठी आता तुम्हाला वाहतूकीचे नियम काटेकोरपणे पाळावे लागणार आहेत. मात्र त्यासंबंधित काही माहीती ही असणे आवश्यक आहे.

वाहतूक पोलिस तुमच्यासोबत असे नाही करु शकत.
वाहतूक पोलिस तुम्हाला नियमाचं उल्लघंन केल्यास थांबवू शकते, मात्र तुम्हाला ही काही अधिकार आहेत. त्या अधिकाराचा तुम्ही वापर करु शकता. तुमच्याप्रमाणेच वाहतूक पोलिसांना ही काही नियामांचे पालन करावे लागते. वाहतूक पोलिस हे त्यांच्या युनिफॉर्ममध्ये असणे आवश्यक आहे. त्यासोबतच युनिफॉर्मवर त्यांचा बकल क्रमांक आणि त्यांचं नाव असणे गरजेचे आहे. जे हे दोन्ही गोष्टी वाहतूक पोलिसांकडे नाहीत. तर त्यांना त्यांचे ओळखपत्र दाखवण्याची विंनती करु शकता. पण वाहतूक पोलिस जर आपले ओळखपत्र दाखवत नसेल तर तुम्ही तुमच्या गाडीचे कागदपत्र त्यांना देऊ नका. तसेच त्या संबंधित वाहतूक पोलिसांकडे चलन बूक किंवा ई-चलन असणे आवश्यक आहे. त्याशिवाय ते नियमानुसार तुम्हाला दंड आकारु शकत नाहीत.

जेव्हा तुम्हाला वाहतूक पोलिस थांबवतो, त्यावेळी तुम्ही तुमची गाडी आरामता रस्त्याच्या कडेला घ्यावी. आणि गाडीचे कागदपत्र दाखवावे. सर्वात महत्वाचे तुम्ही त्यांना तुमच्या गाडीचे कागदपत्र दाखवायचे आहेत. त्यांच्याकडे देऊ नयेत. त्यावेळी तुम्हाला वाहतूक पोलिसांना सहकार्य करायचे आहे. पण अशावेळी वाहतूक पोलिस तुमच्या गाडीची चावी काढून घेऊ शकत नाहीत. मात्र तुम्ही त्यांच्यासोबत गैरवर्तन करु शकत नाहीत. तुम्ही खरचं अडचणीत असाल तर वाहतूक पोलिस तुम्हाला सहकार्य  करु शकतात.
जर आपली कार रस्त्याच्या कडेला उभी असेल तर आपण गाडीच्या आत बसल्याशिवाय क्रेनने ती उचलू शकत नाही. आपली कार चुकीच्या मार्गाने आणि चुकीच्या ठिकाणी उभी आहे, तरच कार उचली जाऊ शकते.

जर वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर वाहतूक पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेतले तर ताब्यात घेतल्यानंतर 24 तासांच्या आत दंडाधिकारी यांच्यासमोर हजर होणे आवश्यक आहे. जर वाहतूक पोलिस तुम्हाला त्रास देत असतील तर संबंधित पोलिस ठाण्यात याची नोंद होऊ शकते. आपण वाहतूक पोलिसांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल लेखी तक्रार करू शकता. तुम्ही वाहतूक पोलिस अधीक्षक (एसपी) किंवा जिल्ह्यातील वरिष्ठ पोलिस अधीक्षक  यांना तक्रार पत्र देऊ शकता. हरियाणा आणि चंदीगड येथे असेही नियम आहेत की दंड भरण्याच्या पावतीवर तुम्ही स्वाक्षरी करण्याधी आपली प्रतिक्रिया लिहू शकतात.

दंड भरण्याचा अर्थ असा नाही की, आपण वाहतूक पोलिसांच्या चुकीच्या वर्तनाबद्दल तक्रार करण्याचा अधिकार गमावला आहे. दंड भरुनही तुम्ही वाहतूक पोलिसांत तक्रार करू शकता. तसेच, आपण वाहतूक पोलिसांशीही आदराने वागले पाहिजे. जर आपण वाहतूक पोलिसांशी गैरवर्तन केले तर वाहतूक पोलिस अजून जास्त दंड आकारु शकतो. 

Previous articleमुलगी पाहायला आले अन् लग्न लावून नवरीला घेऊन गेले
Next article‘लोकतंत्र के स्वर’ आणि ‘द रिपब्लिकन एथिक’ या राष्ट्रपतींच्या निवडक भाषणांच्या संग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशन होणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − six =