Home ताज्या बातम्या मुख्यमंञी देवेंद्र फणडणवीस म्हणाले पुढच्या(अगामी) विधानसभेत विरोध पक्ष किंवा विरोधी पक्षनेता वंचितचा...

मुख्यमंञी देवेंद्र फणडणवीस म्हणाले पुढच्या(अगामी) विधानसभेत विरोध पक्ष किंवा विरोधी पक्षनेता वंचितचा असेल

42
0

नांदेड,दि.31 आॅगस्ट 2019(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी ला भारतीय जनता पार्टीची बी टिम म्हणणाऱ्या काँग्रेसची परिस्थिती आता बी टिमची झाली आहे येणाऱ्या विधानसभेमध्ये बहुदा वंचित बहुजन आघाडी चा माणूस विरोधी पक्षनेता असेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सांगितले महाजन आदेश यात्रेदरम्यान आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्यातून रवाना होण्यापूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत बोलले या पत्रकार परिषदेला आमदार संभाजी पाटील निलंगेकर,खासदार प्रताप पाटील चिखलीकर,आमदार राम पाटील रातोळीकर,आमदार सुजितसिंह ठाकूर, सूर्यकांत पाटील,दिलीप कंदकुर्ते,प्रवीण साले,व्यंकट साठे आदी अनेक लोक उपस्थित होते मागील लोकसभा निवडणुकीदरम्यान वंचित बहुजन आघाडीला काँग्रेसने भारतीय जनता पार्टीचे बी टिम म्हटले होते त्यानुसार या विधानसभा निवडणुकीमध्ये ती परिस्थिती कशी असेल याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले काँग्रेस स्वतः बी टिम झाली आहे भारतीय जनता पार्टीला आता अभूतपूर्व यश मिळवून भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा राज्यात सत्तेत येणार आहे आणि दरम्यान येत्या विधानसभा मध्ये वंचित बहुजन आघाडी चा नेता सभागृहातील विरोधी पक्षनेता असेल असे मत व्यक्त केले महाजन आदेश यात्रेने आत्तापर्यंत 2268 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून 78 विधानसभा मतदारसंघांमध्ये जनतेशी संपर्क साधला जनतेने या माहा जनादेश यात्रेला भरपूर प्रतिसाद दिला असून या यात्रेला पाहून काँग्रेस-राष्ट्रवादीने सुद्धा यात्रा काढल्या पण त्यांना प्रतिसाद मिळाला नसल्याचे फडणीस यांनी सांगितले विरोधी पक्ष म्हणून सुद्धा काँग्रेस राष्ट्रवादीने आपली भूमिका योग्य बजावली नाही आणि त्यामुळेच भाजप-सेना युतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असल्याचा विश्वास फडणीसांनी दाखवला केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी 30 हजार घरांना मंजुरी दिली असून त्यातील 1.25लाख घरे महाराष्ट्रात मिळणार आहेत प्रधानमंत्री आवास योजनेतील 11.20लाख घरे महाराष्ट्र देण्यात आली आहेत, 2011च्या यादीनुसार ही घरे मंजूर होतात पण त्यात असणारे असंख्य त्रुटीमुळे पुन्हा एक नवीन यादी तयार करण्यात येणार असून त्या सर्वांना 2022 पर्यंत घरे दिली जाणार असल्याचे उद्दिष्ट आहे शहरी भागात सुद्धा गरीब जनतेला 5 लाख घरे देण्यात आले आहेत. मराठवाड्यात पाण्याचा नेहमीच दुष्काळ आहे त्यावर सुद्धा मराठवडा वॉटरग्रीड योजना तयार केली आहेत त्या 64 हजार किलोमीटरचे पाईपलाईन टाकून पाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, जालना येथे पाणी देण्यासाठी करण्यात आले आहे तेच इतर ठिकाणी सुद्धा ही योजना पुढे चालवली जाणार आहे त्यासाठी 19 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे पश्चिमवाहिनी नद्यांचे 300 टीएमसी पाणी कोकणातून समुद्रात वाहून जाते त्यातील 175 टीएमसी पाणी मराठवाड्यासाठी कसे आणता येणार यावर काम सुरू आहे बंद पडलेल्या अनेक सिंचन प्रकल्पांना निधी दिला त्यामुळे ती कामे सुद्धा पूर्ण होतील जनतेने बदलत्या काळाची पावले ओळखली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात त्यांचा जास्त विश्वास आहे सध्या भारतात दिसणारे मंदीचे संकट फक्त भारतात नसून मागील चार वर्षापासून जागतिक स्तरावर ही मंदी सुरू आहे केंद्र सरकारने त्यावर उपाययोजना सुरू केल्या असून लवकरच या मंदीच्या समस्यांना समर्थपणे सांभाळले जाईल 10% मागास आरक्षणामध्ये मुस्लिम समाजाला पण आरक्षण आहे याचं उदाहरण देताना यादीमध्ये एक हजारपेक्षा जास्त क्रमांकावर असलेले मुस्लिम विद्यार्थी आरक्षणामुळे 200 मध्ये आला आणि त्यांचा क्रमांक लागला ऊस उत्पादनासाठी भरपूर पाणी लागते ऊसाला पाणी दिले तर इतर पिकांना पाणी देता येणार नाही त्यामुळे काही सुरक्षितता बाळगली जात आहे उसासाठी सुद्धा पद्धतीने पाणी देण्याची सोय सुरू केले जात आहे तसे प्रत्यक्षात आले तर त्यातून सुद्धा मार्ग निघेल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले

Previous articleभोसरी मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे शहानवाज शेख यांच्या नावाची जोरदार चर्चा
Next articleदेहूरोड मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कट आऊट ला लावलं शेन!चार तासात दोन आरोपींना केली अटक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

9 − 4 =