Home ताज्या बातम्या महाराष्ट्र आणि कर्नाटकात पूरग्रस्त भागात लष्कराचे मदत आणि बचावकार्य वेगात

महाराष्ट्र आणि कर्नाटकात पूरग्रस्त भागात लष्कराचे मदत आणि बचावकार्य वेगात

227
0


नवी दिल्ली,7 आॅगस्ट 2019 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये पावसाची संततधार आणि ठराविक काळाने होणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर झाली आहे. काही मोठ्या जलाशयांमधून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गामुळे देखील पाणीपातळीत वाढ झाली आहे. या दोन्ही राज्यात भारतीय लष्कर पूरग्रस्त भागामधे मदत आणि बचावकार्य करत आहे. 7 ऑगस्ट 2019 रोजी सुमारे 1000 जवानांचा समावेश असलेल्या 16 तुकड्या आणि 12 अभियंता कृतीदलं महाराष्ट्रात रायगड, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात तर कर्नाटकमध्ये बेळगांव, बागलकोट आणि रायचूर जिल्ह्यात पाठवण्यात आल्या. आत्तापर्यंत 500 व्यक्तींची पूरातून सुटका करण्यात आली असून ठिकठिकाणी वैद्यकीय मदत आणि अन्नाची पाकिटं वितरित करण्यात येत आहेत. अजूनही रायगड, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी 1200 ते 1300 पेक्षा जास्त लोक अडकून पडले आहेत. त्यांच्या सुटकेसाठी एनडीआरएफ आणि नागरी प्रशासनासह लष्कराचे मदतकार्य अथक सुरु आहे.

Previous articleकलम 370 रद्द करणाऱ्या ठरावाला संसदेची मंजुरी
Next articleसोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने ९ अॉगस्ट क्रांती दिना निमित्त अभिवादन कार्यक्रम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

seventeen + 15 =