Home ताज्या बातम्या तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक संमत होणे हा स्त्री-पुरुष समानतेचा विजय असून समाजात...

तिहेरी तलाक प्रतिबंधक विधेयक संमत होणे हा स्त्री-पुरुष समानतेचा विजय असून समाजात समानता निर्माण होण्यास यामुळे बळ मिळेल:- पंतप्रधान मोदी

129
0


नवी दिल्ली, 30 जुलै 2019 (प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मुस्लीम महिला (विवाह विषयक अधिकार संरक्षण) विधेयक 2019 संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यासाठी ज्या पक्षांनी आणि खासदारांनी या विधेयकाला पाठिंबा दिला त्या सर्वांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आभार मानले आहे. पक्षभेदाच्या पलिकडे जात या सर्वांनी विधेयकाला दिलेल्या  पाठिंब्यामुळेच हे विधेयक मंजूर होऊ शकले. आजचा दिवस भारताच्या इतिहासात कायमचा नोंदला जाईल असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

ही जुनाट मध्ययुगीन परंपरा अखेर इतिहासजमा करण्यात आपल्याला यश आले आहे. संसदेने तिहेरी तलाक रद्द करुन मुस्लीम महिलांविरोधात झालेली ऐतिहासिक चूक दुरुस्त केली आहे. स्त्री-पुरुष समानतेचा हा विजय असून यातून समाजात आणखी समानता निर्माण होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आजचा दिवस सर्व भारतीयांसाठी आनंदाचा दिवस आहे असे ते म्हणाले.

तिहेरी तलाकच्या कुप्रथेमुळे अनेक मुस्लीम महिलांना ज्या संकटांचा सामना करावा लागला त्या सर्वांच्या धैर्यालाही सलाम करण्याचा हा दिवस आहे. तिहेरी तलाक प्रथा रद्द झाल्यामुळे महिला सक्षमीकरणाला बळ मिळेल आणि समाजात महिलांची प्रतिष्ठा वाढेल असे मोदी यांनी म्हटले आहे.

Previous articleअखिल भारतीय व्याघ्र अनुमान-2018 च्या चौथ्या अंकाचे पंतप्रधानांच्या हस्ते प्रकाशन
Next articleमुस्लिम महिला (विवाहविषयक अधिकार संरक्षण) विधेयक 2019 संसदेत संमत, मुस्लिम महिलांची तिहेरी तलाकच्या अभिशापातून मुक्तता :- अमित शहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

four + 15 =