पिंपरी (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी) : भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी नगरसेवक व जयंती महोत्सवाचे आयोजक शेखर आव्हाळ यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे दिली आहे. जयंती महोत्सवांतर्गत आज मंगळवारी (दि. 21 मे 2019) सायं. 6 वाजता पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या मागील पटांगणावर महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या भीमगीतांचा प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, युवा नेते पार्थ पवार, आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे, माजी आमदार आण्णा बनसोडे, विलास लांडे, ज्येष्ठ नेते माजी महापौर आझमभाई पानसरे, डीबीएन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपकभाऊ निकाळजे, उद्योजक नानासाहेब गायकवाड, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील माजी महापौर योगेश बहल, पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त आर.के. पद्मनाभन, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.
Home ताज्या बातम्या जयंती महोत्सवानिमित्तआज मंगळवारी आनंद शिंदे यांचा भिमगीतांचा कार्यक्रम-आयोजक शेखरभाऊ ओव्हाळ