Home ताज्या बातम्या महापौर श्री राहुलदादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

महापौर श्री राहुलदादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

149
0

पिंपरी:दि.१५(प्रजेचा विकास न्युज चॅनल प्रतिनिधी):-
महापौर श्री राहुलदादा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार महेशदादा लांडगे स्पोर्टस् फाउंडेशन व महापौर राहुलदादा जाधव स्पोर्टस् फाउंडेशन यांच्या वतीने सर्व जातीधर्मीय ५५ जोडप्यांचा मोफत सामुदायिक विवाह सोहळा पारंपारिक रितीरिवाजानुसार रामायण मैदान, जाधववाडी, चिखली या ठिकाणी नियोजनबध्द रितीने हजारो लोकांच्या उपस्थितीत मंगलमय वातावरणात पार पडला. सध्या महाराष्ट्रातील काही भागामध्ये जाणवणारी तीव्र पाणीटंचाई, दुष्काळ या गोष्टी लक्षात घेऊन सामाजिक संवेदना जपत महापौर श्री राहुलदादा जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व जातीधर्मीय ५५ जोडप्यांचा मोफत सामुदायिक विवाह सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षी ही वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून महाराष्ट्राच्या विविध भागातील गोरगरीब, मध्यम वर्गीय लोकांचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळयाप्रसंगी सर्व ५५ जोडप्यांचे कन्यादान हे भोसरी विधानसभेचे आमदार मा. श्री. महेशदादा लांडगे तसेच त्यांच्या सुविद्य पत्नी शिवांजली सखी मंचाच्या अध्यक्षा सौ. पुजाताई लांडगे, महापौर राहूलदादा जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी श्री दत्त दिगंबर नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा सौ. मंगलताई जाधव यांच्या हस्ते पार पडले. विवाह सोहळयातील सर्व ५५ जोडप्यांना महापौर राहुलदादा जाधव स्पोर्टस् फाउंडेशनकडून संसारोपयोगी विविध वस्तू देण्यात आल्या. विवाह सोहळयातील बैठक व्यवस्था, भोजनाची व्यवस्था, काटेकोर नियोजन, लग्नप्रसंगी काढलेली भव्य दिव्य मिरवणूक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. सामाजिक जाणीव लक्षात घेऊन हा सर्व जातीधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा सुरक्षित, शिस्तीत, र्निविघ्नपणे, पार पडण्याकरिता हजारो कार्यकर्ते स्वत: मनापासून अहोरात्र मेहनत घेत होते. यावेळी मा. महापौर श्री. राहुलदादा जाधव व आमदार मा. श्री. महेशदादा लांडगे दोघेही सपत्नीक विवाह सोहळयास आलेल्या सर्व मान्यवरांचे व पाहुण्यांचे मन:पूर्वक स्वागत करत होते.याप्रसंगी हजारोंच्या जनसमुदायासह भोसरी विधानसभा आमदार श्री. महेशदादा लांडगे, श्री. मंगलदास बांदल, जुन्नर विधानसभा आमदार श्री. शरददादा सोनवणे, अनाथांची माय सिंधूताई सपकाळ, मा. महापौर श्री. नितीन काळजे, स्थायी समिती अध्यक्ष श्री. विलास मडिगेरी, महापालिकेतील विविध समित्यांचे अध्यक्ष, सन्माननीय नगरसेवक, नगरसेविका याप्रसंगी उपस्थित होते.

Previous article१९ मार्चला शेतकरी संघटना राजकीय भूमिका जाहीर करनार
Next articleगोयल गंगा फौंडेशनचा पुढाकाराने मासिक पाळीबाबतच्या समस्या संदर्भातील जागरुकता कार्यक्रमाचे केले होते आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

16 − 3 =