Home ताज्या बातम्या पार्थ पवारांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष

पार्थ पवारांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष

145
0

पिंपरी,ता.15(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- मावळमधून पार्थ पवार यांची उमेदवारी राष्ट्रवादी पक्षाने आज जाहीर केली. उमेदवारी जाहीर होताच चिंचवड स्टेशन चौकात पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अमित बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली पेढे वाटून फटाके वाजवून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
याबाबत अमित बच्छाव म्हणाले की, मावळ लोकसभा मतदार संघातील जनतेचे प्रलंबित प्रश्न, शास्तीकर माफी ,रिंगरोड, शासकीय रुग्णालयातील अपुर्या वैद्यकीय सुविंधा, आदिवासी समाजातील गरजू प्रश्नाकंडे दुर्लश , शेतकर्यांचे प्रश्न , कामगारांच्या अडचणी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या असे जनतेचे महत्वाचे प्रश्न सोडविण्यात विद्यमान खासदार हे पूर्णपणे अपयशी ठरले आहे. ज्याप्रमाणे अजितदादांनी पिंपरी चिंचवड शहराचा कायापलट करून देशपातळीवर पिंपरी चिंचवड हे विकसित शहर अशी प्रतिमा तयार केली त्याचप्रमाणे पार्थ पवार सुद्धा मावळ लोकसभा मतदार संघाचा सर्वांगीण विकास करतील असा विश्वास आम्हासर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे. पार्थ पवारांना पक्षाने दिलीली उमेदवारी योग्य असून या पक्षाच्या निर्णयाचे स्वागत पिंपरी-चिंचवड मधील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले.पार्थ पवार यांच्या उमेदवारीमुळे आम्हा सर्व पिंपरी चिंचवडमधील युवक वर्गामध्ये उत्सावाचे वातावरण निर्माण झाले आहे. युवक वर्गाला पक्षाने स्थान दिल्यामुळे कार्यकर्त्यांनी पेढे वाटून फटाके वाजवून आनंदीमय वातावरणात जल्लोष केला.
यावेळी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष अमित बच्छाव, मनोज सुतार, अलोक गायकवाड, रोझारिओ डिसुझा, संदीप पाटील, शिवराज रणवरे, शादाफ खान, हर्षल बदाणे पाटील, श्रीकांत इंगळे, आकाश पवार, रोहित पंद्री, अजित मुलाणी, गणेश गवळी, जगदीश पाटील, प्रतिक घोलप, गौरव कांबळे, मनीष पंद्री, मंगेश देवकर, जयेश व-हाडी, दिनेश भास्कर, शशिकांत जाधव, आयुष कोकाटे, बंडू शिंदे, निलेश निकाळजे, मोतीलाल पाटील, पंकज चोपदार, विजय दळवी, मेहबूब मलिक, झहीर खान, संदीप पटने, चंदर शिंदे, अकिल तायडे आदी युवक उपस्थित होते.

Previous articleपार्थ पवार यांच्या समोर अडचणीचे संकेत,शेकाप कार्यकर्त्यानची अजित पवार यांच्या सभेकडे पाठ
Next article१९ मार्चला शेतकरी संघटना राजकीय भूमिका जाहीर करनार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × 2 =