Home ताज्या बातम्या न्यायलयाच्या बाहेरील परिसरात गोळीबार ; तिघा पैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश

न्यायलयाच्या बाहेरील परिसरात गोळीबार ; तिघा पैकी दोघांना पकडण्यात पोलिसांना यश

208
0

पिंपरी(प्रजेचा विकास न्युज चॅनल प्रतिनीधी):-
पिंपरी-चिंचवड मधील रावण टोळी आणि महाकाली टोळी यांच्या टोळ्यांतील वादातून आठवड्यापुर्वी महाकाली टोळीतील सदस्यांवर शिवाजीनगर येथील कामगार पुतळ्याजवळ गोळीबार करून पसार झालेल्या तिघांपैकी दोघांना रोहन चंदेलीया (२०, रावेत) आणि अशोक उत्तरेश्वर कसबे (२४, वाल्हेकरवाडी चिंचवड)दोघांना पिपंरी-चिंचवड गुन्हे शाखेने पकडले असुन,अक्षय साबळे हा फरार आहे. रोहन चंदेलीया हा रावण टोळीतील अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर चिंचवड, निगडी, देहूरोड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर अशोक कसबे याच्यावर देहूरोड, चिखली पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी सिद्धेश्वर धर्मदेव शर्मा (२१, देहूरोड) याने फिर्याद दिली आहे.महाकाली टोळीचा म्होरक्या राकेश उर्फ महाकाली ढकोलिया याच्या एन्काउंटर झाल्यानंतर त्याच्या टोळीत फुट पडून रावण ग्रुप आणि एस. के. ग्रुप अशा दोन टोळ्या निर्माण झाल्या. या टोळ्यांमध्ये सतत वर्चस्वासाठी वाद होत राहतात व रक्त पात खून चालुच आहे. त्यानंतर रावणटोळी व महाकाली टोळ्यांवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. त्या नंतर रावण टोळीतील विनोद गायकवाड याच्यावर दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल आहे. त्यात विरुद्ध टोळीचा सदस्य सुरज वाघमारे हा साक्षीदार होता. तो ७ मार्च रोजी साक्ष देण्यासाठी न्यायालयात आला होता. त्याचवेळी मोक्कातील फरार आरोपी अक्षय साबळे हा ट्रीपलसीट गाडीवर न्यायालयाजवळ आला होता. त्यावेळी एकमेकांकडे बघण्यावरून व साबळे याच्या गाडीवर दगड मारला. त्यावेळी शिवाजीनगर न्यायालयाच्या गेट क्र. ३ जवळील कामगार पुतळ्याजवळ रेल्वे लाईनच्या सुरक्षा भिंतीजवळ झाडाखाली उभा असलेल्या शर्मा याला शिवीगाळ केल्यानंतर. शर्मा व त्याच्या साथीदारांने रेल्वे लाईनच्या भिंतीवरून उडी मारून पळून जाऊ लागले असता त्यावेळी अक्षय साबळे याने रिव्हॉल्वरने सिद्धेश्वर याच्यावर गोळीबार केला. त्यानंतर परिसरात खळबळ उडाली असता. पुणे शहर पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम, सह पोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांच्यासह काही वरीष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोचले.त्यानतंर पिपंरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनीट कडून दरोड्याच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरु होता. त्यावेळी गुन्हे शाखेच्या युनिट मधील सचिन मोरे व सावन राठोड यांना माहिती मिळाली की, शिवाजीनगर न्यायालयाजवळ फायरिंग करणाऱ्यांपैकी दोघे रावेत स्मशानभूमीजवळ येणार आहेत. त्यावर सापळा रचून पोलिसांनी त्यांना अटक केली. त्यातील साथीदार अक्षय साबळे हा फरार असुन.ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तय आर. के. पद्मनाभन, अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतिश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युनीट १ चे पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, कर्मचारी प्रमोद वेताळ, सावन राठोड, सचिन मोरे, गणेश सावंत, तानाजी पानसरे यांच्या पथकाने केली.

Previous articleतेल्हारा तालुक्यातील घटना पत्नीने केली पतीची हत्या
Next articleपार्थ पवार यांच्या समोर अडचणीचे संकेत,शेकाप कार्यकर्त्यानची अजित पवार यांच्या सभेकडे पाठ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nineteen + 10 =