Home ताज्या बातम्या सतराव्या लोकसभेच बिगुल वाजलं,आजपासुन आचार सहिंता लागु:२३ मे २०१९रोजी होणार मतमोजणी,महाराष्र्टात ४...

सतराव्या लोकसभेच बिगुल वाजलं,आजपासुन आचार सहिंता लागु:२३ मे २०१९रोजी होणार मतमोजणी,महाराष्र्टात ४ टप्यात मतदान

165
0

नवी दिल्ली दि.10(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):-लोकसभा 2019 आज 10मार्च 2019 रोजी 5.00वा पासुन आचारसहिंता लागु,लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं असून मुख्य निवडणुक आयुक्त सुनिल अरोरा यांनी तारखा जाहीर केेल्या आहेत .लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली,गेल्या 2014 च्या निवडणूकीच्या वेळीच्या तुलनेत 7 कोटी मतदार वाढले असुन त्याचसोबत यावेळी जवळपास 90 कोटी लोक मतदाता असणार आहेत असे आयुक्त अरोरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. 80-90 वयोगटातील मतदारांची संख्या दीड कोटी असल्याचे सुनील अरोरा यांनी सांगितले. लोकसभेच्या निवडणुका कशा घ्यायच्या. यासंदर्भात सर्व प्रमुख यंत्रणांशी चर्चा केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
देशात यंदा सात टप्प्यात लोकसभा निवडणुकीचं मतदान आहे.
*11 एप्रिल , 18 एप्रिल,*
*मतदान 23 एप्रिल 29 एप्रिल,6* *मे ,12 मे 19 मे असे सात टप्प्यात यंदाची मतदान प्रक्रिया* होणार आहे*
तर *23 मे रोजी मतमोजणी असणार आहे.*
मतदार यादीत नाव चेक करण्यासाठी 1590 वर फोन करा आपले नाव कळेल असेही त्यांनी यावेळी सांगितले.
11 एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान
महाराष्ट्रात 4 टप्प्यात होणार मतदान
पहिल्या टप्प्यात 20 राज्यात 91मतदारसंघासाठी मतदान असेल
दुसऱ्या टप्प्यात 13राज्यात 97 मतदारसंघासाठी असेल मतदान प्रक्रिया
दुसऱ्या टप्प्यातील मतदान 18 एप्रिल, तिसरा टप्पा 23 एप्रिल, चौथा टप्पा 29 एप्रिल रोजी होणार मतदान
23 मे रोजी होणार मतमोजणी
एकूण 7 टप्प्यात होणार लोकसभा निवडणूका
आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास अॅपवर तक्रार करण्याची सुविधा मतदारांना संधी, तक्रारदाराचे नाव गुप्त ठेवणार : निवडणूक आयोग मतदान केंद्रांवर सुरक्षेची पुर्ण काळजी घेणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले
यंदा निवडणुकीमध्ये 90 कोटी मतदार मतदान करतील.
2014च्या तुलनेत 7 कोटी मतदार वाढले.
EVM चा दुरुपयोग टाळण्यासाठी सर्वत्र VVPAT चा वापर केला जाईल.
EVM च्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त, EVMचं जीपीएस ट्रॅकिंग करण्यात येणार.
10 लाख मतदान केंद्रांवर होणार मतदान. 2014 वेळी 9 लाख मतदान केंद्र होती.
मतदार यादीत आपलं नाव आहे पाहण्यासाठी हेल्पलाईन नंबर – 1950
चारसंहितेचा भंग झाल्याच्या तक्रारीसाठी निवडणूक आयोगानं अँड्रॉइट अॅप आणले आहे. या अॅपवर तक्रार करताना तक्रारकर्त्यांना आपलं नाव, संपर्क क्रमांक सांगावा लागेल. तसंच तक्रारीनंतर 100 मिनिटांत काम केलं जाणार.
शिवाय सोशल मीडियावरून होणाऱ्या प्रचारावर निवडणूक आयोगाची नजर असणार आहे. सोशल मीडियासाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वं यंदा तयार करण्यात आली आहेत.
यंदा पहिल्यांदा सर्व मतदान केंद्रांवर VVPAT चा वापर केला जाणार, त्यामुळे सर्वांना आता त्यांनी दिलेल्या मताची खात्री करता येणार.तसंच यंदा तब्बल 10 लाख मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे.सध्याच्या 16व्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जूनला संपणार आहे. त्यामुळे त्याआधी 17 वी लोकसभा अस्तित्वात येणं आवश्यक आहे. लोकसभेच्या एकूण 543जागांवर 7 टप्प्यात निवडणुकीची घोषणा केली आहे. 22 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांत एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. देशात आजपासून आचारसंहिता लागू झाल्याचेही त्यांनी सांगितले.
12 राज्यातील 34 विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठीही लोकसभेबरोबर मतदान होईल.
यंदा सर्व मतदानकेंद्रावर व्हीव्हीपॅट मशीनची सुविधा असेल. त्यामुळे मतदाराला त्याने केलेले मत कोणाला गेले आहे ते समजेल. त्याचबरोबर ईव्हीएमलाही अनेक स्तरीय सुरक्षा असेल. प्रत्येक उमेदवाराला फॉर्म 26 भरावे लागेल. सर्व मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे असतील. संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे चित्रिकरण केले जाणार आहे.
18 ते 19 वर्ष वयोगटातील दीड कोटी नव्या मतदारांची संख्या आहे.
सात टप्प्यात कोठे होणार मतदान

पहिला टप्पा –
20 राज्यात 91 लोकसभा जागांसाठी मतदान –
आंध्र प्रदेश 25, अरुणाचल 2, आसाम 5, बिहार 4, छत्तीसगढ़ 1, जम्मू-कश्मीर 2, महाराष्ट्र 7, मणिपुर 1, मेघालय 1, मिजोरम 1, नागालँड 1, ओडिशा 4, सिक्किम 1, तेलंगाना 17, त्रिपुरा 1, उत्तर प्रदेश 8, उत्तराखंड 5, पश्चिम बंगाल 2, अंदमान-निकोबार 1, लक्षद्वीप 1

दुसऱा टप्पा – 13 राज्यात 97 लोकसभा जागांसाठी मतदान
आसाम 5, बिहार 5, छत्तीसगढ़ 3, जम्मू-कश्मीर 2, कर्नाटक 14, महाराष्ट्र 10, मणिपुर 1, ओडिशा 5, तमिळनाडू 39, त्रिपुरा 1, उत्तर प्रदेश 8, पश्चिम बंगाल 3 , पद्दुचेरी 1

तिसऱा टप्पा – 14 राज्यात 115 लोकसभा जागांसाठी मतदान
आसाम 4, बिहार 5, छत्तीसगढ़ 7 सीटें, गुजरात 26, गोवा 2, जम्मू-कश्मीर 1, कर्नाटक 14, केरल 20, महाराष्ट्र 14, ओडिशा 6, उत्तर प्रदेश 10, पश्चिम बंगाल 5, दादरानगर हवेली 1, दीव दमन 1

चौथा टप्पा – 9 राज्यात 71 लोकसभा जागांसाठी मतदान
बिहार 5, जम्मू-कश्मीर 1, झारखंड 3, मध्यप्रदेश 6, महाराष्ट्र 17, ओडिशा 6, राजस्थान 13, उत्तर प्रदेश 13, पश्चिम बंगाल 8

पाचवा टप्पा – 7 राज्यात 51 लोकसभा जागांसाठी मतदान
बिहार 5, जम्मू-कश्मीर 2, झारखंड 4, मध्यप्रदेश 7, राजस्थान 12, उत्तर प्रदेश 14, पश्चिम बंगाल 7

सहावा टप्पा – 7 राज्यात 59 लोकसभा जागांसाठी मतदान
बिहार 8, हरियाणा 10, झारखंड 4, मध्यप्रदेश 8, उत्तर प्रदेश 14, पश्चिम बंगाल 8, दिल्ली 7

सातवा टप्पा – 8 राज्यात 59 जागांसाठी मतदान
बिहार 8, झारखंड 3, मध्यप्रदेश 8, पंजाब 13, चंडीगढ़ 1, पश्चिम बंगाल 9, हिमाचल 4, उत्तर प्रदेश 13 अशाप्रकारे
सतराव्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल आज वाजला. नवी दिल्लीतील विज्ञान भवनात मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोरा यांनी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला.

Previous articleकुटुंबातील प्रत्येकाची प्रेरणा, आधार व आदर्श ही स्त्रीच असते – अश्विनी जगताप
Next articleपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती पदी नगरसेवक विलास मडिगेरी यांची निवड झाली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

three × 2 =