Home ताज्या बातम्या काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे या सव्वा किलो वजनाचे दागिने अंगावर घालून...

काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे या सव्वा किलो वजनाचे दागिने अंगावर घालून सर्वत्र फिरतात.

156
0

सोलापूर दि.५ फेब्रुवारी(प्रजेचा विकास न्युज सोलापुर शहर प्रतिनीधी):- काँग्रेसच्या सोलापूरमधील नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे या सव्वा किलो वजनाचे (125 तोळे सोने)दागिने अंगावर घालून सर्वत्र फिरतात. सध्या संपूर्ण सोलापुरात श्रीदेवी यांच्या सव्वा किलो सोन्याच्या दागिन्यांचीच चर्चा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. या दागिन्यांची किंमत सुमारे 45 लाख रुपये इतकी आहे.
श्रीदेवी फुलारे सोलापूर शहरातल्या रेल्वे लाईन कोनापूरे चाळ (प्रभाग क्रमांक 15) या भागाचा नगरसेविका आहेत. या भागातून त्या यापूर्वी दोन वेळा निवडून आल्या आहेत. श्रीदेवींचे पती जॉन फुलारे हे कोनापूरे चाळ भागात सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत.
सतरा वर्षांपूर्वी जॉन आणि श्रीदेवी यांचा प्रेमविवाह झाला. तुळजाभवानीच्या मंदिरात त्यांनी लग्न केले. दोघांचेही आई वडील गिरणी कामगार होते. जॉन यांनी अगोदर महानगरपालिकेची आणि नंतर विधानसभेची निवडणूक अपक्ष म्हणून लढविली आहे. परंतु या दोन्ही निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला होता.
श्रीदेवी यांनी 2007 साली शिवसेनेच्या तिकिटावर महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती. परंतु तेव्हा त्यांचा अवघ्या एका मताने पराभव झाला होता. त्यानंतर काँग्रेसचे नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वात त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करुन पक्षासाठी काम केले. 2012 आणि 2017 साली काँग्रेसच्या तिकिटावर श्रीदेवी काँग्रेसच्या तिकिटावर महानगरपालिकेत निवडून आल्या.
फुलारे दाम्पत्यांना दोन मुले आहेत. 5 फेब्रुवारी रोजी श्रीदेवी यांचा वाढदिवस होता. तेव्हा जॉन यांनी श्रीदेवी यांना वाढदिवसानिमित्त सव्वा किलो दागिन्यांची भेट दिली. जॉन हे कंत्राटदार आहेत. व्यवसायातून जमा झालेल्या पैशातून आपण हे सव्वा किलो सोने जीएसटी भरून आणि आयकर रिटर्न्स भरुन विकत घेतल्याचा जॉन यांचा दावा आहे.

Previous articleदेहुरोड उड्डाण पुलाच्या उदघाटनाची घाई का केली गेली
Next articleशास्तीकर माफ करा, अन्यथा जनता माफ करणार नाही-सचिन साठे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

2 × 5 =