Home ताज्या बातम्या गोयल गंगा स्कूलच्या सोनू गुप्ता आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

गोयल गंगा स्कूलच्या सोनू गुप्ता आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

0

पुणे(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी):- गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका सोनू गुप्ता यांना नुकतेच ‘लीडरशिप-एक्सेलन्स’ या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संयुक्त अरब अमीरात येथील मेकाडेमिया संस्थेतर्फे हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.नेतृत्व कौशल्यातून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल गुप्ता यांना गौरविण्यात आले.

‘लीडरशिप-एक्सेलन्स’ हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठित पुरस्कार असून शिक्षण क्षेत्रात आपला विशेष ठसा उमटवणाऱ्या मुख्याध्यापकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. शिक्षकांच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच त्यांचा यशस्वी वाटचालीतून इतरांना प्रेरणा मिळाली, हा या पुरस्कारामागील संस्थेचा उद्देश असतो.
सोनू गुप्ता यांचा गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या यशस्वी वाटचालीत मोलाचा वाटा असून त्यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याने शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना मुख्याध्यापिका भारती भागवाणी यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

17 − 12 =