Home ताज्या बातम्या न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये इको-फ्रेंडली दिवाळी साजरी

न्यू सिटी प्राईड स्कूलमध्ये इको-फ्रेंडली दिवाळी साजरी

164
0

पिंपरी चिंचवड(प्रजेचा विकास न्युज)-रहाटणी येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये इको-फ्रेंडली दिवाळी साजरी करण्यात आली यावेळी सरस्वती प्रतिमेचे पूजन हँबिटेट ऑफ हुम्यनीटी इंडिया ट्रस्टचे सदस्य कपिल अग्रवाल (Habitat Of Humanity India Trust) यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
यावेळी शाळेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी विद्यार्थ्यांना इको-फ्रेंडली दिवाळीचे महत्व पटवून दिले. फटाके फोडण्याने वायू प्रदूषण व ध्वनी प्रदूषण होते. याबद्दल जनजागृती करण्यात आली. दिवाळीचे आकर्षण असलेले किल्ले बनवण्यासाठी सध्या बाजार असलेले प्लास्टर ऑफ पॅरिसने बनवलेले किल्ले न घेता दगड मातीचे किल्ले बनविने अधिक हित कारक आहे. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांनी हँबिटेट ऑफ हुम्यनीटी इंडिया ट्रस्टचे सदस्य कपिल अग्रवाल ह्याना सामाजिक बाधीलकीतून चेक स्वरूपात डोनेशन देण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापिका श्राबणी पत्रनाभिश, मंजुळा मुदलीयार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यावेळी उपस्थीत होते. यावेळी शिप्रा हजेला यांनी सूत्रसंचालन केले व प्रियंका लाडे यांनी आभार मानले.

Previous articleसुनील ढाले यांची कॉंग्रेस जिल्हा सरचिटनिस पदी निवड
Next articleस्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री लौह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची १४३वीं जयंती आणि भारताच्या माजी आणि पहिल्या एकट्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्या ३४वीं पुण्यतिथी निमित्त पिंपरी चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाने वाहिली आदरांजली !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

two + thirteen =