Home ताज्या बातम्या उन्नती सोशल फौंडेशनच्या वतीने नऊ दिवस नऊ रंगाचे सर्व सामान्य माणसाच्या...

उन्नती सोशल फौंडेशनच्या वतीने नऊ दिवस नऊ रंगाचे सर्व सामान्य माणसाच्या जीवनातील महत्त्व विषयी जनजागृती करण्यात आली,

94
0

पिंपरी-चिंचवड(प्रजेचा विकास न्युज प्रतीनीधी)-नवरात्र उत्सवात महिला नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या परिधान करतात मात्र येथील उन्नती सोशल फौंडेशनच्या वतीने नऊ दिवस नऊ रंगाचे सर्व सामान्य माणसाच्या जीवनातील महत्त्व या विषयी जनजागृती करण्यात आली, या उपक्रमाला परिसरातील नागरिकांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
पहिल्या दिवशी निळा रंग असल्याने लेखणीला महत्व देत, लेखणी हे विचार व्यक्त करण्याचे सर्वश्रेष्ठ साधन आहे.म्हणून उन्नति सोशल फाऊंडेशन बद्दलचा आपला अनुभव व कविता ,लेख पाठवाण्याचे आवाहन करण्यात आले होते.उत्कृष्ठ लेखाला व कवितेला बक्षीस देण्यात आले.
दुसर्या दिवशी रंग पिवळा.त्यानिमिताने आपल्या देशात सिग्नलचे महत्व वाहन चालकांना कळावे म्हणून जनजागृती करण्यात आली , रस्त्यावर रोजच होणारे अपघात हे पिवळ्या रंगाचा सिग्नल न पाळता घाई केल्यामुळे होतात. सिग्नलवरील पिवळा रंग म्हणजे संयम पाळणे होय.सिग्नलवरील अति घाई संकटास नेई.चला एकजूट होऊन शपथ घेऊया…ट्रॅफिक सिग्नलचे नित्याने पालन करूया…! असे यावेळी वाहन चालकांना सांगण्यात आले.
आजचा रंग हिरवा माणसाला ६ महिन्याचा ऑक्सिजन निर्माण करण्यासाठी अब्जावधी रुपयांचा खर्च येईल.झाडे हे सर्व आपल्याला मोफत देतात म्हणून या दिवशी येथील जरवरी सोसायटीमध्ये वृक्षा रोपण करण्यात आले.
आजचा रंग करडा या दिवशी मानवाचे वाहनांवर अवलंबून असलेले आपले रोजचे आयुष्य हे सुद्धा वायुप्रदूषणास मोठा हातभार लावत आहे.वाहनांचा वापर गरजे पुरताच करावा, सायकल किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर केल्यास पर्यावरण रक्षणास मदत होईल म्हणून पिंपळे सौदागर परिसरात सायकल रॅली काढून वायू प्रदूषणाचे महत्व सांगण्यात आले.
आजचा रंग भगवा. या दिवशी गरजवंतांच्या उपयोगी येणे म्हणजेच मदत असते असे नाही, मदत एक मानसिक समाधान आहे. आज कुणाला तरी मदत करा आणि समाधान मिळवाअसे आवाहान नागरिकांना करण्यात आले. फाऊंडेशनच्या वतीने पिंपळे गुरव येथे तारा सोफेश धडफळे सेंटर (दिव्यांग मुला-मुलींचे अनाथालय ) मुलांची शाळा आहे तेथे जाऊन त्या मुलांसोबत काही क्षण घालवले व त्या मुलांसाठी खाऊ वाटप केला,त्यांना लागणारे साहित्य, औषधे व खेळाचे साहित्य देण्यात आले.समाजाने परिवर्तनाचा ध्यास घ्यावा हा संदेश फौंडेशनच्या वतीने दिला.
आजचा रंग पांढरा.या दिवशी पांढरा रंग नेहमी आपले मन आणि बुद्धी यांवर चांगला प्रभाव करतो तसेच विचार आणि कार्यामध्ये शुद्धता आणतो.आज आपला संपूर्ण दिवस पांढरे कपडे घालवून साजरा करा असे आवाहान करण्यात आले.
आजचा रंग लाल.या दिवशी तुमच्या रक्ताचा एक थेंब, एखाद्या व्यक्तीचे जीवन वाचवू शकते.चला रक्तदान करूया माणुसकी ची उंची वाढवूया…रक्तदान करा असे आवाहन करत फाऊंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .दरम्यान, ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले
आजचा रंग आकाशी या दिवशी आकाशी रंग आत्मविश्वासाचे प्रतीक आहे.आज समाजामध्ये याच आत्मविश्वासाने यशाची उंची गाठलेल्या लोकांना सन्मानित करून इतरांना पुढील वाटचालीसाठी आत्मविश्वास देन्यात आला . या रत्नांच्या पंखांना बळ देण्याचे काम उन्नति सोशल फाऊंडेशनच्या वतीने “घे भरारी” याउपक्रमाद्वारे करणार आली. यशाचे शिखर गाठताना असंख्य वेदना व त्रास सहन करूनच ही रत्ने उल्लेखनीय कार्य करू शकतात. त्यांना सन्मान व प्रोत्साहन असेल व इतर सर्वांना प्रेरणादायी ठरेल. असे म्हणत सन्मान केला
आजचा रंग गुलाबी.या दिवशी गुलाबी रंग प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे प्रतीक. आज ‘ती’ ला अशी वागणूक द्या जसे आपल्याला वाटले पाहिजे किआपण आपल्या बहिणीला हा सन्मान देत आहोत.त्यामुळे समाजातील प्रत्येकानी महिलाचा सन्मान करण्यासाठी जनजागृती करण्यात आले .
यात आनंद हास्य योग क्लब व नव चैतन्य हास्य योग् परिवार या परिवारातील सभासदांनी सहभाग घेतला होता

Previous articleकामगार मंडळास उर्वरित जागा न दिल्यास मगर स्टेडिमयचा ताबा घेणार : भारती चव्हाण यांच्यासह गुणवंत कामगारांचा इशारा
Next articleविजडम इंग्लिश मेडिअम हायस्कुल विकासनगर किवळे देहूरोड व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था पुणे जिल्हा आयोजित पर्यावरण व स्वछता रॅलीचे भव्य आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

fourteen − 1 =