मावळ(प्रजेचा विकास न्युज प्रतिनीधी)- मंञीमंडळ विस्तारात सुर्यकांत वाघमारे यांची वर्णी लागणार अशी चर्चा संपुर्ण पुणे जिल्हात सुरु आहे,मावळ तालुका व पुणे जिल्हा यांच्या वतीने पञकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते
दि.3 आॅक्टोबर 2018 रोजी ठाणे येथे संपन्न झालेल्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (A) पक्षाचा 61 वा वर्धापन दिन संपन्न झाला. त्यावेळी महाराष्र्टाचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस हे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की,रिपब्लिकन पक्षाला महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष पद दिले.या पदाला राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्याची कार्यवाही त्वरित केली जाईल. त्याच बरोबर रिपब्लिकन पक्षाला आणखी एक मंत्रीपद महाराष्र्टाच्या मंत्रिमंडळात नजीकच्या काळात होणार्या मंत्रीमंडळ विस्तारात निचित पणे देवून भाजप आपला शब्द पाळेल.
मुख्यमंत्र्याच्या वरील घोषणेनुसार रिपब्लिकन पक्षांतून कोणाला मंत्रीपद मिळणार याची चर्चा सुरू झाली. या मध्ये प्रदेशाध्यक्ष भुपेश थूलकर व पक्षाचे राष्र्टिय सचिव अविनाश महातेकर यांच्या नावाची चर्चा पूर्वी पासूनच होती. परंतू या यादीत पुणे जिल्हयाचे विदयमान अध्यक्ष व लोणावळा नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष, शिक्षण मंडळाचे मा.सभापती श्री.सुर्यकांत वाघमारे यांचे नाव देखील पक्षाच्या गोटातून पुढे आले.
त्यामुळे मावळ तालुक्याला मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार यामुळे संपुर्ण पुणे जिल्हयात कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण आहे. सामान्य कुटूंबातून आलेल्या एका उत्तुंग व्यक्तिमत्वाला व प्रगल्भ अनुभव असलेल्या नेतृत्वाचा विचार पक्षाच्या वतीने होतोय याचाच जास्त आनंद कार्यकर्त्यामध्ये आहे. वाघमारे साहेबांना मंत्रीपद मिळावे आशी इच्छा सर्व स्तारातुन व्यक्त होत आ
सर्व समाजामध्ये तसेच बहूजन समाजामध्ये असलेली त्यांची आदरयुक्त प्रतिमा. अभ्यासू वक्ता म्हणून त्याची असलेली ख्याती. आदर्श चारित्र्य,दिर्घउदयोगी स्वभाव, चांगल्या आरेाग्याचे धनी आशी त्यांची संपूर्ण जनमानसात प्रतिमा आहे.भारतीय दलित पॅथर पासून ते रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया च्या आज पर्यंतच्या प्रदीर्घ राजकीय प्रवासात एकच पक्ष व एकच नेत्याच्या म्हणजे माननीय केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली वाटचाल सुरू असून त्यांच्या नेतृत्वावरील निष्ठा कधीही ढळू दिली नाही व एकनिष्ठ राहीले
तालुका अध्यक्ष व पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून मागील 24 र्वाापासून अत्यंत कुशलतेने संघटन करून संपूर्ण जिल्हयांत मजबूत संघटन अबाधित ठेवले. अनेक अभिनव उपक्रम व कल्पक कार्यक्रमाच्या माध्यमातून नवनवीन कार्यकर्त्याना आकर्षित करून कार्यकर्त्याचा संचय वाढवण्याचा त्यांचा सतत ध्यास असतो.यामुळे संपूर्ण जिल्हयात मोठा कार्यकर्त्याचे संघटन त्यांनी निर्माण केले.
लोणावळा नगर पालिका शिक्षण मंडळात सभापती म्हणुन त्यांनी आपली कारकिर्द गाजवली आहे
व लोणावळा नगरपालिकेत हे एक अभ्यासु नगरसेवक म्हणुन सर्व परिचीत राहले आहेत.
नगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणुन तर त्यांची कारकीर्द प्रशासनाच्या दृष्टिने अत्यंत प्रभावी ठरली होती.त्यामुळे मंत्रीपद मिळाल्यास अनुभवाचा निचित त्यांना फायदा होईल. निर्भिड व निपक्ष पत्रकार म्हणुन मागील 30 वर्षापासुन ते पत्रकारीतेत मावळ सम्राट च्या माध्यामातून सक्रिय असल्याने सर्व धर्मीयांच्या व सर्व जाती धर्माच्या मुलभूत समस्या प्रश्नाची त्यांना चांगल्या प्रकारे जाण आहे.पत्रकरितेत राहुन देखील त्यांनी सर्वांशी जवळकीचे नाते त्यांनी जपले आहे मागील 30 वर्षापासुन मावळ सम्राट हे वृत्तपत्र चालवित आहेत.
कार्यकर्ता स्वताच्या पायावर उभा राहिला पाहिजे, याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. यासाठी त्यांनी रिपाई रोजगार व उदयोग निर्माण समितीचे कामकाज अत्यंत अल्पावधीत संपुर्ण महाराष्र्ट भर पसरविले केंद्रीय व राज्यस्तरांवरील आर्थिक महामंडळातुन हजारो कार्यकर्त्यानां आर्थिक कर्ज उपलब्ध करून देवून स्वःताच्या पायावर उभे केले.त्यातुनच त्यांनी रामदास आठवले औदयोगिक उत्पादन व बहुउद्देाीय संस्था स्थापन केली.त्या मार्फत राजरत्न चिक्कीचे उत्पादन सहकारी तत्वावर सुरू केले
2009 च्या विधान सभा मध्ये निवडणुकीमध्ये रिडालोस या आघाडीच्या माध्यमातुन मावळ तालुका,विधानसभा,मतदार संघातील पक्षाच्या उमेदवारास 16 हजार मतांची आघाडी मिळवुन देण्यास सिंहाचा वाटा.पुणे जिल्हा परिषदेत पक्षाच्या 2 कार्यकर्तेनां समाज कल्याण सभापती पद मिळवुन दिले.जिल्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये सरपंच,उपसरपंच,सदस्यपदी अनेक कार्यकर्ते निवडुन आणले.संपुर्ण जिल्यात साधारण 600 ते 800 पर्यंत सर्व सामान्य कार्यकर्त्यानां विशेष कार्यकारी अधिकारी पदे मिळवुन दिली.त्यामुळे येणा-या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत यश संपादनासाठी मा.सुर्यकांत वाघमारे यांच्या मंत्री पदामुळे युतीला यश मिळविणे अत्यंत सहज सोपे होईल.
सामाजाशी नाळ जेडलेल्या आणि कार्यात चोख भुमिका बजवणार्या कार्यकर्त्याला महाराष्र्टाच्या मंत्रीमंडळात स्थान मिळावे आशी मागणी लोणावळा शहर, मावळ तालुका व पुणे जिल्हयाच्या वतीने होत आहे. लोणावळा हे शहर महाराष्र्टाच्या राजकिय घडामोडीत नेहमीच चर्चेत राहिले आहे.परंतु हे शहर महाराष्र्टाच्या मंत्रीमंडळात अदयाप प्रतिनिधीत्वा पासुन वंचित राहिले आहे. मा.सुर्यकांत वाघमारे यांना मंत्रीमंडळात स्थान दिल्यास लोणावळेकरांना देखील न्याय मिळेल अशी भावना सर्व समाजात निर्माण होईल यासाठी सर्व समाजातुन मागणी होत आहे.अशी माहिती वडगाव मावळ येथे मावळ तालुका व पुणे जिल्हाच्या वतीने देण्यात आली.यावेळी लक्ष्मण भालेराव(अध्यक्ष-मावळ तालुका),गणेश गायकवाड (सरचिटणीस पुणे जिल्हा),संतोष कदम(युवक अध्यक्ष ता.मावळ),दिलीप दामोदरे(कार्याध्यक्ष ता.मावळ/नगरसेवक लोनवळा नगरपालिका),अशोक सरवते(प्रधान सचिव ता.मावळ),रविंद्र गायकवाड(सरचिटणीस ता.मावळ),अशोक गायकवाड(उपाध्यक्ष पुणे जिल्हा),संजय अडसुळे(उपाध्यक्ष पुणे जिल्हा),धम्मरक्षित जाधव(संघटक पुणे जिल्हा),सिद्धार्थ कदम(अध्यक्ष रिपब्लिकन जेष्ठ नागरिक संघ),कमलेश म्हसके(अध्यक्ष लोणवळा शहर),खंडुशेठ जाधव(कार्याध्यक्ष पुणे जिल्हा),तुयेल शेख(अध्यक्ष अल्पसंख्यांक अघाडी मावळ) उपस्थित होते