Home ताज्या बातम्या *पिंपरी पालिकेत संरक्षक जाळी बसली, पण सर्वसामान्यांच्या व्यथा कायम..-अमित बच्छाव

*पिंपरी पालिकेत संरक्षक जाळी बसली, पण सर्वसामान्यांच्या व्यथा कायम..-अमित बच्छाव

216
0

पिंपरी: मुंबई मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे मंत्रालयात सुरक्षा जाळी बसविण्यात आली होती. त्याच धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेत देखील सुरक्षा जाळी बसविण्यात आली आहे. या जाळीची जोरदार चर्चा पालिका वर्तुळात सुरू आहे.त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेत संरक्षक जाळी तर बसली, परंतू सर्वसामान्यांच्या व्यथा कायमच आहेत.अशी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पिं.चीं.शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केली आहे.
याबाबत बच्छाव यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंचवार्षिक निवडणूकीत भाजपकडून पिंपरी चिंचवड शहरातील विवीध प्रलंबित समस्या संदर्भात आश्वासनांची खैरात करण्यात आली होती.आश्वासनांचे गाजर दाखवित भाजप सत्तेत आली.परंतू आजतागायत दिलेल्या आश्वासनांची पुर्ती करण्यात सत्ताधारी अकार्यक्षम ठरले आहेत.शहरातील स्थगीत घरकुल-झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प,रिंगरोडचा मुद्दा,वाढती गुन्हेगारी,बेकायदा बांधकामे,शास्तीकर माफी,२४ तास पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य अशा अनेक विषयांत शहरवासीयांचा अपेभाभंग झाला आहे. यापैकी कोणताही प्रश्न सत्तेत येऊनसुध्दा भाजपने सोडविलेला नाही.उलट निवडणूकीपुर्वी शहरातील समस्या सोडविल्या जातील,भाजपला एका सत्ता द्या असे म्हणणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पिंपरी-चिंचवडमध्ये जाहीर सभा घेतली.मात्र,त्यासाठी त्यांना पावला-पावलावर पोलिस उभे करावे लागले. झेड प्लस सुरक्षाव्यवस्था असलेल्या मुख्यमंत्र्यांनी पोलिस छावणीचे स्वरूप आलेल्या शहरात हा दौरा केला.याचाच अर्थ कोणतीही भरीव कामगीरी न करता मात्र सत्ताधा-यांनी फक्त उद्घाटन/भुमिपूजन/जाहिरातबाजी करण्यातच धन्यता मानली असल्याने यामुळे शहरातील जनतेत सत्ताधा-याविषयी मोठ्या प्रमाणात असंतोष पहायला मिळतेय.त्यामुळेच पिंपरी चिंचवड महापालिकेत संरक्षक जाळी बसवून भाजपने स्वत:च्या निष्क्रीय कारभारावर पांघरून घालायचे काम केले आहे.असे बच्छाव यांनी म्हटले आहे.

Previous article*चंद्रकात पाटील म्हणजे “विनाशकाले विपरीत बुध्दी”* – युवानेते अमित बच्छाव
Next articleकेंद्रीय राखीव सुरक्षा दल तळेगावमध्ये अंबी तळेगांव येथील डॉ. डी. वाय. पाटील इंस्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट यांच्या वतीने रक्षाबंधन साजरा करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one + ten =