Home ताज्या बातम्या *विठूनामाच्या गजरात किड्स वर्ल्ड शाळेची वृक्ष दिंडी विकासनगर,किवळे मध्ये*

*विठूनामाच्या गजरात किड्स वर्ल्ड शाळेची वृक्ष दिंडी विकासनगर,किवळे मध्ये*

133
0

देहुरोड(यल्लेश शिवशरण)-*दि.२३/७/२०१८*
विकासनगर किवळे देहूरोड येथील *किड्स वर्ल्ड* शाळेची आज आषाढी एकादशी निमित्त वृक्ष दिंडी काढण्यात आली,या शाळेत प्री-प्रायमरी पर्यंत ची लहान चिमुकली मुले आणि सोबत पालकांचाही उत्साह विशेष वाखाणण्याजोगा होता,पालकही या दिंडीमध्ये उत्साहाने सहभागी झाले होते, मुलांच्या हातात, वृक्ष संवर्धनाबाबत जनजागृती करणारे फलक होते, या वृक्षदिंडीमध्ये स्थानिक नगरसेविका कु.प्रज्ञा खानोलकर, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा.दीपक भवर, पुणे जिल्हा सचिव मा.शाल्मली भोसले, सदस्य येल्लेश शिवशरन, सामाजिक कार्यकर्ते रोहित सरनोबत आदींनी आपली उपस्थिती दर्शविली, या प्रसंगी छोट्या मुलांनी विविध वेशभूषा परिधान केल्या होत्या,प्रभातफेरी दरम्यान वृक्ष वाचवा, झाडे लावा,पर्यावरणाची काळजी घ्या अशा घोषणा देण्यात येत होत्या,कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे संचालक मा.दिनेश चिगाटे, मुख्याध्यापिका मा.सुनीता चिगाटे,शाळेतील शिक्षक उज्ज्वला ढवळे, गीता तेलंग,आरती कडू , सुवर्णा वाघ, अनुराधा शिरपुरे, अंजना शर्मा, प्रतिभा नायडू, अपर्णा डाखोरे, मोनिका अगरवाल, अफरीन, यांनी विशेष मोलाचे योगदान दिले, सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मा..चिगाटे सर आणि मॅडम दोघेही पर्यावरणाचे कार्य करत आहेत, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेत ते सदस्य म्हणून कार्यरत आहेत,

Previous article*काकासाहेब शिंदेंची आत्महत्या नसून सरकार पुरस्कृत हत्या !* *युवानेते अमित बच्छाव यांचा आरोप*
Next article*चंद्रकात पाटील म्हणजे “विनाशकाले विपरीत बुध्दी”* – युवानेते अमित बच्छाव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

ten + four =