Home ताज्या बातम्या रयत विद्यार्थी विचार मंच महाराष्ट्र आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा आनंदात...

रयत विद्यार्थी विचार मंच महाराष्ट्र आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ सोहळा आनंदात पार पाडला.

155
0

रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने कै.नारायण मेघाजी लोखंडे कामगार भवन पिंपरी या ठिकाणी १०वी १२वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय पोलीस उपायुक्त गणेश शिंदे सर तसेच प्रमुख पाहुणे महापौर (पिं चिं मनपा ) नितीन (अप्पा ) काळजे, कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक/अध्यक्ष्(रयत विद्यार्थी विचार मंच) धम्मराज साळवे सर कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्ष अंजनाताई गायकवाड हे उपस्थित होते.

यावेळी गुणवंत विद्यार्थीनी म्हणून प्रतीक्षा सौदागर शिंदे हीचा पोलीस उपायुक्त गणेश शिंदे सर तसेच महापौर नितीन अप्पा काळजे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.यास कारण कि प्रतीक्षा शिंदे हिने घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असताना हि व तिच्या १० विच्या वर्षात तिच्या आईचे मेंदूचे दोन वेळा शस्त्रक्रिया झाली. त्यातच वडिलांचा अपघात होऊन ते एका पायाने अपंग झाले. तरी देखील अश्या हालाखीच्या प्रसंगी तिने १० वि मध्ये ९२. २०% गुण घेऊन उत्तीर्ण झाली परंतु निकालाच्या आधीच तिच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

यावेळी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे सर कार्यक्रमाचे अध्यक्ष्य धम्मराज साळवे सर स्वागताध्यक्ष अंजना गायकवाड व रयत विद्यार्थी विचार मंच पदाधिकाऱ्यांच्या हस्ते ५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा प्रशस्तिपत्रक,सन्मानचिन्ह,तुळशीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे मार्गदर्शक पोलीस उपायुक्त गणेश शिंदे सर यांनी आपले मार्गदर्शन व्यक्त करताना सांगितले कि विदयार्थ्यांनी प्रत्येक संकटावर मात केली पाहिजे तसेच स्पर्धा परीक्षा,उद्योग या क्षेत्राकडे वळले पाहिजे तसेच सोशल मीडिया चा अति वापर टाळावा,गुन्हेगारी क्षेत्राकडे जाऊ नये अश्या विविध विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये धम्मराज साळवे यांनी असे मत व्यक्त केले कि रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या माध्यमातून शोषित पीडित वंचित विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचली पाहिजे यासाठी आम्ही काम करत आहोत. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्याने भविष्यात देशाला घडविणारे चांगले नागरिक व अधिकारी तयार होतील .

यावेळी पोलीस उपायुक्त गणेश शिंदे सर,महापौर नितीन (अप्पा) काळजे याना शॉल आणि भारतीय संविधान देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच यावेळी सर्व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत कार्यक्रमाच्या स्वागत अध्यक्ष अंजना गायकवाड यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महासचिव संतोष शिंदे यांनी केले. यावेळी संदेश पिसाळ,शशिकांत कुंभार,संतोष शिंदे,नीरज भालेराव ,मेघा आठवले,रोहित कांबळे,आनंद विजापूरे,समाधान गायकवाड, कोमल बोर्डे,ऋषिकेश हेंद्रे,अतुल वाघमारे,अजय यादव,संदीप निंबळे,सागर मोकाशी ,सागर गायकवाड,निखिल यादव असे सर्व रयत विद्यार्थी विचार मंचाचे पदाधिकारी उपस्थित होते. सामाजिक कर्कयकर्ते साकीभाऊ गायकवाड,सिद्धीकभाई शेख,संदीप पिसाळ,सुनील ढसाळ,विनोद सूर्यवंशी, निलेशभाऊ निकाळजे,अकीलभाई मुजावर,अभिजीत पवार,संकल्प गोळे,सतीश कदम,राहुल डंबाळे उपस्थित होते.

Previous articleमहासभा योग्य रितीने चालविण्या करीता सत्ताधा-यांनी राष्ट्रवादीकडे ट्युशन लावावी
Next article*ञिरत्न बौध्द महासंघ धम्मक्रांती बुध्दविहार विकासनगर,देहुरोड-काळेवाडी यांच्या विद्यामाने गुणवंत विद्यार्थी गुणगौरव संभारंभ पार पडला.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

five × 2 =