पिंपरी: एके काळी सभा तहकुबीवरून राष्ट्रवादीवर बेछूट आरोप करणा-या सत्ताधारी भाजपने मात्र महासभा तहकुबीचा विक्रम नोंदविला आहे.यामुळे शहर विकासाला खिळ बसत आहे.भाजपला जर महासभा चालविता येत नसेल तर सत्ताधा-यांनी राष्ट्रवादीकडे ट्युशन लावावी,अशी बोचरी टिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,पिं.चीं.शहर उपाध्यक्ष अमित बच्छाव यांनी केला आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात बच्छाव यांनी म्हटले आहे की,आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असे लौकिक असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेची सव्वा वर्षात तब्बल विस वेळा तर मे महिन्यात तिन वेळा सभा तहकुब करून सत्ताधा-यांनी शहराचे मोठे नुकसान केले आहे.दोन-दोन महिने सर्वसाधारण सभा होत नाही. यामुळे विकासकामांना खीळ बसत आहे. मात्र, याचे सत्ताधा-यांना कोणतेही गांभिर्य राहिलेले नाही. सभा तहकूब करुन सत्ताधारी हे महाराष्ट्र शासनाने लोकप्रतिनिधींना बहाल केलेल्या अधिकारांचे हनन करत असल्याचा आरोप त्यांनी केला.महिन्यातून एकदा महासभेचे आयोजन करण्यात येते त्यामुळे शहरातील विवीध बाबींवर प्रकाश टाकून त्या अनुषंगाने पुढील विकासकामांची आखणी केली जाते.परंतू सत्ताधा-यांना मुळात त्याचे काही एक घेणे देणे नाही.महासभा कशी चालवावी ? याबाबत सत्ताधा-यांना उमजत नसल्याचे दिसत आहे.या अगोदर काळात कित्येक वर्षे राष्ट्रवादीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा कारभार सांभाळला परंतू त्यांनी कधिही महासभा अशा प्रकारे तहकुब करून लोकप्रतिनिधी त अथवा जनतेलस वेठीस धरले नाही.त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये प्रशासकीय कामे कशी हाताळायची,महासभा कशा पध्दतीने चालवायच्यात? याचा पक्षातील नेत्यांना दांडगा अनुभव आहे.त्यामुळे शहर विकासाची गती मंदावू नये म्हणून सत्ताधा-यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे ट्युशन लावावी,असे बच्छाव यांनी म्हटले आहे.