Home ताज्या बातम्या पालखी सोहळा बैठक प्रेसनोट दि.07/06/2018

पालखी सोहळा बैठक प्रेसनोट दि.07/06/2018

108
0

कृपया प्रसिध्दीसाठी                                                                                                                          पिंपरी चिंचवड महानगरपालिका

माहिती व जनसंपर्क कार्यालय

पिंपरी, ०७ जून २०१८ – आषाढीवारी पालखी सोहळ्यानिमित्त येणा-या सर्व वारकऱ्यांसाठी सर्व प्रकारच्या सोईसुविधा महानगरपालिकेच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.
आज स्थायी समिती सभागृहात झालेल्या आषाढीवारी पालखी सोहळा स्वागत समारंभ व पालखी मुक्कामाचे नियोजनाच्या आढावा बैठकप्रसंगी ते बोलत होते.
महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस महापौर नितीन काळजे, स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने, मनसे गटनेते सचिन चिखले, आयुक्त श्रावण हर्डीकर, विधी समिती सभापती माधुरी कुलकर्णी, शहर सुधारणा समिती सभापती सिमा चौगुले, महिला व बाल कल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, ब प्रभाग अध्यक्षा करुणा चिंचवडे, ड प्रभाग अध्यक्ष शशिकांत कदम, इ प्रभाग अध्यक्षा भिमाबाई फुगे, फ प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, ग प्रभाग अध्यक्ष बाबासाहेब त्रिभुवन, नगरसदस्य विलास मेडिगेरी, नामदेव ढाके, सुरेश भोईर, तुषार कामठे, नगरसदस्या सुवर्णा बुर्डे, आशा
शेंडगे, शर्मिला बाबर, अश्विनी जाधव, मीनल यादव, माधवी राजापुरे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, गणेश गावडे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रविण आष्टीकर, दिलीप गावडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख, क्षेत्रीय अधिकारी मंगेश चितळे, संदीप खोत, स्मिता झगडे, नितीन कापडणीस, आशा राऊत, प्रदीप मुथा, कार्यकारी अभियंता
प्रवीण लडकत, संजय खाबडे, प्रवीण घोडे, दिपक सुपेकर, महावितरण भोसरीचे कार्यकारी अभियंता मदन शेवाळे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता उमेश कवडे, प्रशासन अधिकारी सिताराम बहुरे, प्रभावती गाडेकर, रमेश भोसले, सहाय्यक आरोग्याधिकारी पी. आर. तावरे, जी.एस.देशपांडे, डी. एस, सासवडकर, पशुवैद्यकीय अधिकारी अरुण दगडे, उद्यान अधिक्षक दत्तात्रय गायकवाड, अन्न व औषध प्रशासनाचे
दिलीप करंजखेले, कायदा अधिकारी सर्जेराव लावंड, सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, वरीष्ठ पोलीस अधिकारी व्हि. प. पळसुले, अजित लकडे, सतीश पाटील, के. डी. खैरे, एस. एन. धेंडे, व्हि. डी. वर्पे, एन. पी. कदम, पिंपरी पोलीस स्टेशनचे श्रीधर जाधव, मसाजी काळे, भोसरी पोलीस स्टेशनचे नरेंद्र जाधव, संत तुकाराम महाराज संस्थान देहू पालखी सोहळा प्रमुख अशोक मोरे, सुनील दामोदर मोरे, सुनील दिगंबर मोरे,
विठ्ठल मोरे, नितीन देशमुख, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, अंबर चिंचवडे आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीमध्ये उपस्थितांनी निगडी येथील भक्ती शक्ती चौक व आळंदी फाटा, भोसरी येथे भव्य उंच कमानी उभारण्यात याव्यात, आकुर्डी येथे मुक्कामाच्या ठिकाणी पुरेशी पिण्याच्या पाण्याची, शौचालयाची, पाण्याच्या टँकरची व प्रकाश योजनेची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या. पालखी मार्गावर पुरेशी प्रकाश योजना असावी. आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात दर्शन बारी साठीची योग्य ती व्यवस्था करावी. पालखी
मार्गावरचे अतिक्रमण, रस्त्यावरील खड्डे बुजवावेत व कचराकुंड्या स्वच्छ ठेवाव्यात अशाही सूचना यावेळी प्राप्त झाल्या. पालखी मार्गावरील रस्त्याची कामे पूर्ण करण्याच्या सूचना महापौर नितीन काळजे यांनी दिल्या. तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशा सूचना पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिल्या.
पालखी सोहळ्या समवेत पाण्याचे टँकर व वैद्यकीय सेवा सुविधांसह अॅम्बुलन्स ची व्यवस्था करून देण्याच्या सूचना या बैठकीत करण्यात आल्या.
पालखी मुक्कामाच्या ठिकाणी पिण्याचे पाणी, पुरेशी सुरक्षा व्यवस्था, फिरते शौचालय यांची व्यवस्था करण्याच्या सूचना तसेच पालखी सोहळा कालावधीत शहरात स्वच्छता ठेवणे, पालखी मार्गस्थ झाल्यानंतर रस्ते स्वच्छ ठेवणे व पालखी मार्गक्रमणामध्ये संबंधित सर्व विभागांनी चोख व्यवस्था करण्याच्या सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित सर्व विभागप्रमुखांना या बैठकीत दिल्या.

प्रशासन अधिकारी

Previous articleब-क्षेत्रीय आरोग्य विभागाची प्लॅस्टीक वापर बंदी मोहिम
Next articleसिकंजी सरबत विक्रीचा स्टॉल
admin

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

5 × three =