Home महाराष्ट्र बारा बलुतेदार महासंघाचा भाजप उमेदवार राजेंद्र गावित यांना पाठिंबा

बारा बलुतेदार महासंघाचा भाजप उमेदवार राजेंद्र गावित यांना पाठिंबा

100
0

पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या प्रचारास मतदारांचा चांगला पाठिंबा मिळत असतानाच विविध समाज घटकही भाजपच्या विकास यात्रेत सामिल होत आहेत. याच प्रक्रियेचा एक भाग म्हणून पालघर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदार राजेंद्र गावित यांना बारा बलुतेदार महासंघातर्फे पाठिंबा देण्यात आला आहे. महासंघाचे अध्यक्ष नागेश दत्तात्रेय जाधव यांनी गुरूवारी भाजप उमेदवाराला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रावसाहेब दानवे यांना एक पत्र लिहून जाधव यांनी आपल्या महासंघाच्या पाठिंब्याचा निर्णय कळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीने प्रभावित होऊन महासंघ भाजपला पाठिंबा जाहिर करत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. गाव रहाटीत बारा बलुतेदारांची भुमिका महत्वाची असते. न्हावी, धोबी, कुंभार, सोनार, बेलदार, लोहार, सुतार, भोई, वडारी या सारख्या अठरापगड जातींचा समावेश बारा बलुतेदारांमध्ये होतो. या बारा बलुतेदारांमुळेच गावगाडा नीट चालत असतो. त्यामुळेच ग्रामीण व्यवस्थेतील एक महत्वाचा घटक असलेल्या बारा बलुतेदारांच्या संघटनेने पाठिंबा जाहिर केल्याने भाजपचा त्याचा निश्चितच फायदा होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Previous articleपालघर निवडणुकीत गावित यांनाच मतदान करा- रामदास अाठवले
Next articleबौद्धवाड्याची मर्यादा ओलांडून रिपब्लिकन पक्षाची शाखा गावात स्थापन करा – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
admin

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

twelve − 5 =