Home पिंपरी पर्यावरण वृद्धीसाठी ६० हजार वृक्ष लागवड

पर्यावरण वृद्धीसाठी ६० हजार वृक्ष लागवड

198
0
Prajecha Vikas

पिंपरी – पर्यावरण वृद्धीसाठी ६० हजार वृक्ष लागवडीचे उद्धीष्ट डोळ्यासमोर ठेवून हा आरखडा तयार करण्यात येणार असून याकामी शहरातील प्रत्येक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी विविध संस्थांनी व नागरिकांनी एकत्रितरित्या काम करावे असे मत नगरसदस्य विलास मडीगेरी यांनी व्यक्त केले.
आज पिंपरी चिंचवड महानगरपालिका, वृक्षप्राधिकरण यांच्या वतीने आयोजित वृक्षारोपण जनजागरण बैठक ऑटो क्लस्टर, पिंपरी येथे आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी शहर सुधारणा समिती सभापती सिमा चौघुले, महिला व बालकल्याण समिती सभापती स्वीनल म्हेत्रे, ह प्रभाग अध्यक्षा कमल घोलप, नगरसदस्य तुषार हिंगे, शीतल उर्फ विजय शिंदे, नगरसदस्या शर्मिला बाबर, अश्विनी जाधव, प्रभाग समिती स्विकृत सदस्य कुणाल लांडगे, विठ्ठल भोईर, संदीप गाडे, दिनेश यादव, विजय लांडे, सागर हिंगणे, मुख्य उद्यान अधिक्षक सुरेश साळुंके, वृक्ष मित्र व सामाजिक कार्यकर्ते भय्यासाहेब लांडगे, पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष विकास पाटील, गोरोबा गुजर, उद्यान अधिक्षक दत्तात्रय गायकवाड, प्रकाश गायकवाड, संस्कार प्रतिष्ठानचे डॉ. मोहन गायकवाड, जेष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष सुर्यकांत मुथियान, ग्राहक मंचाचे रमेश सरदेसाई, सामाजिक कार्यकर्ते व वृक्षमित्र अमोल देशपांडे, संभाजी बारणे, सचिन काळभोर, संतोष कवडे, संदीप सकपाळ, दत्तात्रय माने, राजकिरण दाभाडे, संभाजी वाघमारे, प्रदीप साळवे व बहुसंख्येने वृक्षप्रेमी उपस्थित होते.
नगरसदस्य विलास मडीगेरी, तुषार हिंगे, वृक्ष मित्र व सामाजिक कार्यकर्ते भय्यासाहेब लांडगे यांनी चित्रफितीद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले व उपस्थितांकडून आलेल्या सूचना जाणून घेतल्या. व या सूचनांच्या अनुषंगाने पुढील काळात या सूचना प्रत्यक्षात कार्यरत करण्याबाबत सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसदस्य तुषार हिंगे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले यांनी मानले.

Previous articleगोयल गंगा इंटरनैशनल स्कुलचा निकाल १०० टक्के
Next articleप्रजेचा विकास साप्ताहिकाचा प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला.
admin

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

nine + four =