Home देश देशातील ५६ टक्के लोकांचा मोदी सरकारवर विश्वास – सर्वेक्षण

देशातील ५६ टक्के लोकांचा मोदी सरकारवर विश्वास – सर्वेक्षण

213
0

नवी दिल्ली – सत्तेत येऊन चार वर्ष मोदी सरकारने पूर्ण केली असून सरकार योग्य दिशेने वाटचाल करत असल्याचे देशातील ५६ टक्के लोकांनी म्हटले आहे. कम्यूनिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने केलेल्या सर्वेक्षणात मोदी सरकारने एकतर आश्वासनांची पूर्तेता केली आहे किंवा अपेक्षा वाढवल्या आहेत असे प्रत्येक १० जणांमागे सहाजणांनी सांगितले आहे. मोदी सरकारच्या चार वर्ष पुर्तीवर सध्या देशभरात सरकारच्या कामकाजावरुन चर्चा सुरु असताना या सर्वेक्षणामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे.

भारताच्या पाकिस्तानविरोधात धोरणाला कम्यूनिटी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लोकल सर्व्हिसच्या सर्व्हेनुसार, सर्व्हेत सहभागी तीन चतुर्थांश लोकांनी पाठिंबा दिला आहे. याशिवाय टॅक्स टेररिझम कमी झाले असून, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) योजना यशस्वी झाली असल्याचे ५४ टक्के लोकांनी सांगितले आहे. सर्व्हेनुसार, मोदी सरकार आपल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी योग्य मार्गावर असल्याचे ५६ टक्के लोकांनी सांगितले आहे. भाजप आणि मोदी सरकारसाठी ही आकडेवारी दिलासादायक असली तरी गतवर्षी झालेल्या सर्वेक्षणात हेच मत ५९ टक्के लोकांनी नोंदवले होते. २०१६ मध्ये हा आकडा ६४ टक्के होता. याचाच अर्थ सरकारची विश्वासार्हता कमी होत गेली आहे.

Previous articleआरोग्य मिळावा, ते ही तुमच्या बजेटमध्ये
Next articleआशिष शेलार ‘ऑपरेशन कमळ’साठी स्पेशल चार्टर्ड विमानाने बंगळुरुला रवाना
admin

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

eight + thirteen =