Home ताज्या बातम्या कराड येथील पवन सोलवंडे यांची गोळ्या झाडून हत्या

कराड येथील पवन सोलवंडे यांची गोळ्या झाडून हत्या

0

कराड,दि२१आॅगस्ट२०१९(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी-अजय पोळळ):-कराड येथील गुंड पवन सोलवंडे यांच्यावर बेछूट गोळीबार करून त्याची हत्या करण्यात आली आहे. हा प्रकार मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठ परिसरात घडला. या घटनेनंतर कराड शहर व परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. चार अज्ञात हल्लेखोरांनी पवन याच्यावर केलेल्या बेछूट गोळीबारात त्याच्यावर 11 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. हल्लेखोर स्थानिकच असावेत असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून त्या दिशेने तपास चक्रे गतिमान करण्यात आले आहेत. तीन वेगवेगळी तपास पथके तयार करून संशयितांच्या शोधासाठी रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान सोमवारी रात्रीच्या सुमारास मंगळवार पेठेतील बांधकाम व्यवसायिक निहाल अल्ताफ पठाण याला खंडणी मागून ती न दिल्याने त्याच्या घराच्या परिसरात पवन सोलवंडेेसह अन्य चौघांनी नंग्या तलवारीची दहशत माजवला प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

7 − two =