रावेत, दि.२९ ऑक्टोबर २०२५ (प्रजेचा विकास ऑनलाइन न्यूज प्रतिनिधी):- “जय छठी मैया”च्या गजराने आज पवना नदीचा काठ भक्तीमय वातावरणाने दुमदुमला!
रावेत परिसरातील श्री दिपक मधुकर भोंडवे सोशल फाउंडेशन यांच्या सौजन्याने उत्तर भारतीय बांधवांच्या श्रद्धेचा आणि आस्थेचा उत्सव मानल्या जाणाऱ्या छठ पूजेचे भव्य आयोजन करण्यात आले.
पवना नदी विसर्जन घाटावर पार पडलेल्या या धार्मिक सोहळ्यात उत्तर भारतीय कुटुंबांनी पारंपरिक वेशभूषेत सूर्य उपासना करत “छठ माई”च्या विविध पूजा व विधी मोठ्या श्रद्धेने पार पाडले. संध्याकाळी सादर झालेल्या गंगा आरतीने तर संपूर्ण परिसर दैवी प्रकाशाने उजळून निघाला.
मागील अनेक वर्षांपासून दीपक भोंडवे हे छठपूजेचे आयोजन करत असून, “देश, धर्म आणि संस्कृती यांचा संगम टिकवणे ही आपली जबाबदारी आहे; छठ पूजा हा त्या भावनेचा प्रतीक आहे,” असे विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाला परिसरातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.
त्यात भाजप रावेत-वाल्हेकरवाडी मंडळ अध्यक्ष श्री. मोहन राऊत, सौ. शिल्पा राऊत, देहूरोड कंटोन्मेंट बोर्डचे माजी उपाध्यक्ष श्री. रघुवीर शेलार, उत्तर भारतीय संघाचे श्री. दिनेश सिंह यांसह अनेक मान्यवरांनी सहभाग नोंदवला.
उपस्थित बांधवांनी दीपक भोंडवे यांचे आयोजनाबद्दल मनःपूर्वक आभार मानत त्यांचा सत्कार केला. “जय छठी मैया”च्या अखंड गजरात भक्ती, आनंद आणि ऐक्याचे वातावरण भारून गेले होते.
Home ताज्या बातम्या छठ माईच्या आराधनेने उजळला पवना घाट; दिपक भोंडवे यांच्या पुढाकाराने साकारला श्रद्धेचा...





