Home ताज्या बातम्या प्रभाग क्र १६ मध्ये अपात्कालीन मोबाईल ॲप लोकार्पण आणि वितरण…

प्रभाग क्र १६ मध्ये अपात्कालीन मोबाईल ॲप लोकार्पण आणि वितरण…

0

रावेत,दि.२५ ऑगस्ट २०२५( प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):- पिंपरी-चिंचवड शहरात प्रथमच महिलांच्या सुरक्षेसाठी आपत्कालीन मोबाईल “ALERTO APP समीर लॉन्स, रावेत येथे झालेल्या विशेष कार्यक्रमात या ॲपचे लोकार्पण आणि वितरण सोहळा यशस्वीरित्या पार पडला.

आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून त्या त्या क्षेत्रात प्रगती करताना दिसत आहे, पण तरीसुद्धा महिला सुरक्षितेच्या प्रश्न काही प्रमाणात कायम आहे. त्या अनुषंगाने आपात्कालीन, अडचणीच्या वेळी ह्या ॲप मधल्या फक्त मोबाईलच्या एक क्लिकच्या साहाय्याने त्या ठिकाणी संकटात असणाऱ्या महिलेला तत्काल मदत होऊ शकते. त्या पिकांचे लोकेशन, घरच्या सदस्य व नातेवाईकांना मेसेज अलर्ट, सायरन वाजणे तसेच व्हिडिओ रेकॉर्डिंग इ. अशा अनेक सुविधा या द्वारे उपलब्ध होणार आहे. मोबाईलच्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग महिलांना संकटाच्या काळात ह्या मोबाईल ॲप द्वारे करता येईल. या वितरण सोहळा दरम्यान संपूर्ण ॲप ची संपूर्ण माहिती, तांत्रिक प्रात्यक्षिक महिलांना व उपस्थितांना देण्यात आली.
अत्यंत मोठ्या संखेने आणि उत्साहात महिलांनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती.
माझ्या परिसरातील प्रत्येक माता-भगिनी स्वाभिमानाने आणि निर्भीडपणे समाजामध्ये राहिली पाहिजे. त्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात यावी असा श्री.दिपक मधुकर भोंडवे सोशल फाउंडेशनचा उद्देश आहे.
पिंपरी-चिंचवड भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष श्री.शत्रुघ्न(बाप्पू)काटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते या उपक्रमाचे लोकार्पण करण्यात आले.

‘या ॲपच्या सहाय्याने आपत्कालीन प्रसंगी त्वरित मदतीसाठी संपर्क साधता येईल, ज्यामुळे महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे एक क्रांतिकारक पाऊल ठरणार आहे असे मत अधीक्षक सुवर्णा अथणीकर यांनी मांडले.
पोलीस अधिकारी श्री.खिळे यांनी या ॲपचे महत्त्व पटवून देत सदर ॲप द्वारे पोलिसांनाही तपास कार्यात मदत व सहकार्य होईल असे नमूद केले.

‘या प्रसंगी महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देत अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली त्याबद्दल माननीय शहराध्यक्ष यांनी श्री.दिपक मधुकर भोंडवे फाउंडेशनचे अभिनंदन केले . माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टी राज्यामध्ये महिलांच्या सुरक्षेतेसाठी कटिबद्ध आहे तसेच राबवण्यात येणाऱ्या अनेक महिलांकरिता योजनांचा उल्लेखित याप्रसंगी श्री. काटे यांनी केले.
या उपक्रमामुळे पिंपरी चिंचवड शहरातील महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून समाजात सुरक्षित वातावरण निर्माण होण्यास मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला’.

उपस्थित श्री.नामदेव ढाके(मा. सत्तारूढ पक्षनेते,भाजपा), मा.श्री काळुराम बारणे(चिंचवड विधानसभा प्रचार प्रमुख, भाजपा) मा. सौ. सुवर्णा अथणीकर (अधीक्षक, केंद्रीय जीएसटी अँड सीमाशुल्क विभाग), श्री. मोहन राऊत(रावेत वाल्हेकरवाडी मंडल अध्यक्ष,भाजपा), श्री. सोमनाथ भोंडवे(मा. अध्यक्ष रावेत-काळेवाडी मंडल अध्यक्ष), सौ पल्लवीताई वाल्हेकर (मा.महिला मोर्चा अध्यक्ष, भाजपा), सौ.ऍड.प्रीतीसिंह(कायदे तज्ञ, विधी सेल भाजपा), श्री राहुल खिळे (पोलीस उपनिरीक्षक रावेत पोलीस स्टेशन), श्री.नवनाथ ढवळे, श्री. सुरेश भोंडवे, श्री किरण भोंडवे, श्री संतोष(आप्पा) भोंडवे, श्री.कुणाल भोंडवे,श्री.धर्मपाल तंतरपाळे,ऍड.राजेश राजपुरोहत,सौ.अश्विनी मेहता(सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, रावेत पोलीस स्टेशन), श्री.संतोष म्हस्के,सौ.माधुरीताई सावळे(रावेत- वाल्हेकरवाडी महिला मोर्चा अध्यक्ष, भाजपा),सौ.वैशालीताई वाघचौरे तसेच इतर मान्यवर व श्री.दिपक मधुकर भोंडवे सोशल फाउंडेशन चे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.ऍड.सौ.प्रीतीसिंह परदेशी यांनी आलेल्या मान्यवर आणि उपस्थित यांचे आभार मानले.यावेळी या कार्यक्रमाचे सूत्र संचालन (लेखिका) सौ.हेमलता चौधरी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

1 + nine =