Home ताज्या बातम्या झोपडपट्टी धारकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न करणार

झोपडपट्टी धारकांच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न करणार

0

पिंपरी,दि.१२ नोव्हेंबर २०२४ (प्रजेचा विकास न्यूज प्रतिनिधी):-बाळासाहेब ओव्हाळ यांचा पदयात्रांचा किंवा प्रचाराचा महत्वाचा सूर असा राहिला कि फिरताना , बोलताना झोपडपट्टी धारकांच्या समस्या समजावून घेणे आणि त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांच्या दैनंदिन गरजेच्या आवश्यक सुविधा कशाप्रकारे उपलब्ध करून देता येतील, यावर त्यांनी भर दिला आहे.समस्या सुटाव्यात यासाठी नागरिकांच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्धार ते व्यक्त करताना दिसत आहेत. नागरिकांशी संवाद साधत असतानाच या परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांना भेटून चर्चा करण्यावर त्यांनी भर दिला आहे. प्रचाराच्या या पहिल्या टप्प्यात त्यांनी विद्यानगर,आकुर्डी,मोहनगर प्राधिकरण या परिसरातील सोसायट्यां आणि विविध कॉलनीतील घरांना त्यांनी भेट देण्यासाठी जोमात भेट देत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

one × one =