Home ताज्या बातम्या डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा लवकरात लवकर बसवावा- शरद गायकवाड

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा लवकरात लवकर बसवावा- शरद गायकवाड

0

चिंचवड,दि.११ मार्च २०२४(प्रजेचा विकास न्युज प्रतिनिधी):- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याची मागणी युवा भीमसेनेचे जिल्हाध्यक्ष शरद गायकवाड यांनी केली आहे.निगडी भोसरी रस्त्यावर थरमॅक्स चौक असून त्या चौकाला विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक असे नाव देखील देण्यात आले आहे. त्या ठिकाणी डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा बसवण्याची मागणी नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात होत आहे.त्या मागणीची दखल घेत पाठपुरावा करत युवा भीमसेनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष शरद गायकवाड यांनी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंग यांना पत्र दिले आहे.जर त्या चौकात पुर्णाकृती पुतळा बसवण्यात नाही आला तर युवा भीमसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देखील पुणे जिल्हाध्यक्ष शरद गायकवाड व पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष अनील सूर्यवंशी यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

six − three =